पेठवडगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अचानक रस्त्यावरील बाजार बंद केल्यामुळे शेतकरी, व्यापारी यांनी बंदी झुगारून छुप्या पद्धतीने विक्री केली, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. आज बाजारपेठेत अपवादानेच पालिका कर्मचारी दिसले.
वडगाव पालिकेने अचानक रस्त्यावरील व जनावरे बाजार दोन सोमवारचा आठवडे स्थगित करत असल्याचे जाहीर केले; मात्र सोमवारच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी यांनी भरगच्च नियोजन केले होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी विक्रीचे धोरण ठेवले. भाजी मंडई, धान्य लाइन, एस टी स्टॅण्ड, नुक्कड काॅर्नर, सणगर गल्ली,सराफ गल्ली,पद्मा रोड आदी ठिकाणी भाजीपाला विक्रीचे धोरण स्वीकारले, तर पालिका चौकात फळ विक्रेत्यांनी कहरच केला. तर शहरात नो मास्क..नो हुड (वस्तू) चा फज्जा सातत्याने उडालाच होता, तर अनेक व्यापाऱ्यांनी विना मास्क व सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला होता. पोलीस, पालिका कर्मचारी काही ठिकाणी व्यापारी, शेतकरी यांना अटकाव केला; मात्र आडोश्याला उभे राहून व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले. आज रात्री उशिरापर्यंत विना मास्क, सोशल डिस्टन्सची कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
पेठवडगाव: येथे रस्त्यावरील आठवडी बाजार बंद करण्यात आला असला, तरी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता.