शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्यामकांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 11:47 IST

ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्यावर शुक्रवारी सकाळी पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हापूर आणि परिसरातील कला क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. जाधव यांचे चिरंजीव इंद्रजित आणि धनंजय यांनी अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देश्यामकांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार कोल्हापूर आणि परिसरातील कला क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्यावर शुक्रवारी सकाळी पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हापूर आणि परिसरातील कला क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. जाधव यांचे चिरंजीव इंद्रजित आणि धनंजय यांनी अंत्यसंस्कार केले.सकाळी १0 वाजता त्यांच्या उत्तरेश्वर पेठेतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. १0.४५ वा.च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी दोन दिवसांपूर्वी नातीला रंकाळ्यावर फिरायला घेऊन गेलेल्या जाधव सर यांच्या निधनाचे वृत्त अनेकांना रात्री उशिरा व्हॉटस अ‍ॅपवरून समजले. त्यावेळी अनेकांना धक्का बसला.

वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांचा सर्वत्र वावर असे. जाधव यांनी स्थापन केलेल्या ‘रंगबहार’ व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाल्याने आज ज्येष्ठ चित्रकारांबरोबरच तरुण कलाकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सुरेश शिपूरकर, शिवाजी म्हस्के, चंद्रकांत जोशी, जी. एस. माजगावकर, एम. आर. देशमुख, अशोक धर्माधिकारी, शाहीर राजू राऊत, संपत नायकवडी, विलास बकरे, संजय शेलार, संजय संकपाळ, सर्जेराव निगवेकर, मनोज दरेकर, अजेय दळवी, विजय टिपुगडे, टी. डी. कुलकर्णी, सुरेश पोतदार, बाळासाहेब पाटील, सागर बगाडे, पी. एस. जाधव, संग्राम भालकर यांच्यासह ‘रंगबहार’ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.डोक्यावर नेहमी बॅरट कॅपघराबाहेर पडताना नेहमी डोक्यावर बॅरट कॅप वापरण्याचा श्यामकांत जाधव यांचा शिरस्ता होता. ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत हे जाधव यांचे मित्र. तेदेखील अशीच कॅप वापरायचे. बॅरट कॅप ही जाधव यांची एक वेगळी ओळख होती.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर