शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

अत्याळच्या जवानावर शोकाकुलात अंत्यसंस्कार

By admin | Updated: July 7, 2015 01:41 IST

अपघातात झाले होते गंभीर जखमी

गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील जवान सुरेंद्र शिवाजी देवरकर यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निपाणीनजीक झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रविवारी (दि. ५) सकाळी पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास पुण्याहून त्यांचे पार्थिव जन्मगावी अत्याळ येथे घरी आणण्यात आले. यावेळी वडील शिवाजी, आई सिंधुताई, पत्नी रेश्मा, बहीण सविता व सुप्रिया यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तहसीलदार हनुमंत पाटील, सुभेदार पी. के. सिंग, जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे निवृत्त सुभेदार तानाजी संकपाळ, आजी-माजी सैनिक संघटनेचे धोंडिबा हळदकर यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली. नंदापाचीवाडीनजीकच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राचार्य एस. आर. पाटील, विजय पाटील, आर. के. मोहिते यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. बॉम्बे रेजिमेंट व व्हाईट आर्मीच्या जवानांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)