पेठवडगाव: शहरातील विविध विकासकामासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यातून वडगाव नगरपालिकेस चार कोटींचा निधी प्राप्त झाला असून यासाठी गटनेत्या प्रविता सालपे यांच्यासह आम्ही पाठपुरावा केला असल्याची माहिती नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी दिली. शहरातील संभाजी उद्यान उद्घाटनप्रसंगी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी घोषणा केली होती.त्यानुसार मुश्रीफ यांनी प्रत्यक्षात निधीची पूर्तता केली. सेनापती धनाजीराव जाधव स्मारक विकसित करण्यासाठी एक कोटी ७० लाख रुपये, मराठा समाज अभ्यासिका पहिला मजला बांधकामासाठी ३0 लाख रुपये, दत्त कॉलनी अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे व आर.सी.सी. गटर्स करिता २७ लाख रुपये,अपराध वसाहत येथील येथील काशिद घर ते भोसले घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे तसेच राजर्षी छत्रपती शाहू व्यायाम मंदिर इमारत बांधण्यासाठी २३ लाख रुपये,भाजी मंडईमध्ये सिटी सर्व्हे नंबर १३७ ,आरक्षण क्र. ३६ व्यापारी इमारत उभारणे पहिला मजला बांधकामासाठी १ कोटी ५० लाख आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. या निधीसाठी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, गटनेत्या प्रविता सालपे,अजय थोरात,मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्यासह नगरसेवकांचे सहकार्य लाभले.यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासकामाला गती मिळणार आहे. शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष माळी यांनी दिली.
फोटो कॅप्शन ०८ वडगाव
पेठवडगाव: वडगाव पालिकेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विकासकामासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल सत्कार करताना नगराध्यक्ष मोहनलाल माळी,गटनेत्या प्रविता सालपे,नम्रता ताईगडे,मैमून कवठेकर, शबनम मोमीन, राजू कवठेकर आदी उपस्थित होते.