शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

शिवाजी विद्यापीठाला गुरूच्या सन्मानार्थ व्याख्यानमालेसाठी निधी

By admin | Updated: July 13, 2015 00:45 IST

अंबुजा साळगांवकर यांची गुरुदक्षिणा : एम. एस. प्रसाद यांच्या नावासाठी कुलगुरुंकडे दोन लाखांचा धनादेश सुपूर्द

कोल्हापूर : सुमारे २५ वर्षांपूर्वी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. एम. एस. प्रसाद यांनी दूरदृष्टीने शिवाजी विद्यापीठात संगणकशास्त्र शिक्षणाचे बीज रोवले. त्यांच्या विद्यार्थिनी असलेल्या डॉ. अंबुजा साळगांवकर यांनी आपल्या गुरूच्या सन्मानार्थ संगणकशास्त्र अधिविभागात कायमस्वरूपी व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी दोन लाख दहा हजार रुपयांच्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला. डॉ. साळगांवकर या विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागात पूर्णवेळ नियुक्त झालेल्या पहिल्या अधिव्याख्यात्या तसेच विभागाच्या पहिल्या पीएच.डी.धारक असून, सध्या मुंबई विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. साळगांवकर यांच्या प्रामाणिक भावनांचे आपण स्वागत करत असून, त्यांचे हे कार्य अत्यंत आदर्शवत आहे. व्याख्यानमाला माजी विद्यार्थ्यांना विविध नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन विद्यापीठाच्या समृद्धीसाठी पुढे येण्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. यावेळी सांख्यिकी अधिविभाग प्रमुख प्रा. डी. टी. शिर्के, संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. आर. के. कामत उपस्थित होते. विद्यापीठाच्या इतिहासात माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून शिक्षकाच्या सन्मानार्थ व्याख्यानमाला सुरू होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. प्रा. प्रसाद सरांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरात संगणक शिक्षणाचा प्रसार झाला. १५ आॅगस्टला प्रा. प्रसाद यांचा वाढदिवस असतो. त्याचे औचित्य साधून दरवर्षी आॅगस्टमध्ये संगणकशास्त्र अधिविभागात संगणकशास्त्रविषयक व्याख्यान आयोजित केले जावे. ट्युरिंग अ‍ॅवॉर्ड हे संगणक शास्त्रातील नोबेल प्राईज मानले जाते. या वक्त्याने एका ट्युरिंग पुरस्कार विजेत्याचे कार्य यांची ओळख आपल्या व्याख्यानातून करून द्यावी, अशी अपेक्षा आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटनपर पहिले पुष्प मुंबईतील शास्त्रज्ञ प्रा. विवेक पाटकर गुंफणार आहेत. असाच उपक्रम आयआयटी कानपूरमध्ये प्रा. सहस्त्रबुद्धे यांच्या सन्मानार्थ डॉ. नारायण मूर्ती यांच्या योगदानातून सुरू आहे. त्यातून प्रेरणा मिळाली. - डॉ. अंबुजा साळगांवकर