शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

डिझायनर पणत्यांची रोषणाई

By admin | Updated: November 7, 2015 00:20 IST

बाजारात गर्दी : साठ रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंचे विविध प्रकार उपलब्ध

कोल्हापूर : दिवाळीत दारात सजलेल्या रांगोळीवर पणती लावली की, त्या अंगणाचे सौंदर्यही खुलून उठते. या सजावटीत अधिक भर टाकण्यासाठी मातीच्या पारंपरिक पणत्यांसह गणपती, तुळशी वृंदावन, लक्ष्मी, सिरॅमिक, हँगिंगसह डिझायनर पणत्यांना सर्वांधिक मागणी आहे. दिवाळी म्हटली की, आकाशकंदील, लाईटच्या माळांसोबत पणत्यांची खरेदी होतेच. किंबहुना, पणत्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या दिव्यांना अधिक महत्त्व आहे. चार वर्षांपूर्वी केवळ लाल मातीपासून बनविलेल्या पारंपरिक पणत्या लावल्या जात असत; पण आता मात्र त्यांची जागा डिझायनर पणत्यांनी घेतली आहे. अशा डिझायनर पणत्यांनी बाजारपेठ काबीज केली आहे. सिरॅमिकच्या पाना-फुलांच्या, बारीक नक्षीकाम असलेल्या, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या अशा अनेक विविध प्रकारच्या पणत्या आपल्याला पाहायला मिळतील. याशिवाय साध्या पणत्यांवर रंगांनी केलेली कसाकुसर, डिझाईन, तसेच कुंदन वर्क, लेस वर्क, मोती वर्क, अशा पणत्यांही सजावटीत आणि पूजेत रंगत आणतात. साध्या पणत्यांची किंमत दहा रुपये डझनपासून सुरू आहे, तर एलईडीच्या तसेच डिझायनर पणत्या ६० रुपये जोडीपासून ते पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सजावट साहित्यांच्या दुकानांत पणत्यांचे विविध प्रकार ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.तरंगणाऱ्या पणत्या..फेंगशूई भारतातही अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. त्यात अगदी हॅपिमॅन, पिरॅमिडपासून ते वाजणाऱ्या, दारात अडकविल्या जाणाऱ्या घंट्यांपर्यंतचा समावेश आहे. यातच आता पणत्यांचीही भर पडली आहे. तरंगणाऱ्या पणत्याही घराघरांत दिसत आहेत. मध्यभागी मेणाच्या पणत्या आणि भोवतीने पाना-फुलांची सजावट केलेल्या या पणत्या लक्ष वेधतात.  

सध्या फ्लोटिंगच्या (तरंगणाऱ्या) व एलईडीच्या दिव्यांना अधिक मागणी आहे. फ्लोटिंगचे दिवे अधिक आकर्षक असतात, तर एलईडी दिवे तुम्ही कोणत्याही लाईट कनेक्शनशिवाय वापरू शकता. शिवाय ते अन्यवेळी सणासमारंभालादेखील वापरता येतात. - साईनाथ महामुनी (कलाकार)