शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

आवाडेंना उमेदवारी दिल्यास ‘शविआ’चा पूर्ण पाठिंबा

By admin | Updated: November 27, 2015 01:10 IST

विधानपरिषदेचे राजकारण : पक्षप्रतोद अजित जाधव यांची ग्वाही

इचलकरंजी : विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना उमेदवारी दिली तर त्यांना शहर विकास आघाडी व कारंडे गटाच्या नगरसेवकांचा पाठिंबा असेल. इतकेच नव्हे, तर इचलकरंजीच्या विकासासाठी आवाडे यांना विजयी करू व अन्य नगरपालिकांतील नगरसेवकांचे मतदान मिळविण्यासाठी शहर विकास आघाडी जोरदार प्रयत्न करेल, अशी ग्वाही या आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी ‘शविआ’चे निमंत्रक तानाजी पोवार व प्रमोद पाटील उपस्थित होते. सुरेश हाळवणकर हे इचलकरंजीचे आमदार असून, विधान परिषदेच्या निमित्ताने या शहरास आवाडेंच्या रूपाने आणखीन एक आमदार मिळत असेल, तर शहराचा विकास अधिक गतीने होईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.आमदार हाळवणकर व आवाडे यांची गुरुवारी एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी आवाडे यांनी कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींचे माझ्या उमेदवारीवर एकमत झाले आहे, असे हाळवणकर यांना सांगितले. माझी उमेदवारी निश्चित झाली असून, त्यासाठी तुम्ही मला पूर्णपणे पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली, अशी माहिती देऊन जाधव म्हणाले, शहराला दोन आमदार मिळाले तर काळम्मावाडी धरणातून थेट पाणी योजना, आयजीएम रुग्णालयाचे शासनाकडे हस्तांतरण, सोलर सिटी, वायफाय सिटी असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार करण्यास मोलाची मदत मिळेल. म्हणून इचलकरंजी शहरातील सर्व ६२ नगरसेवकांनी आवाडे यांना निवडून द्यावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य मतेही मिळविण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी केले. आवाडेंना निवडून आणण्याची प्रामाणिक इच्छापत्रकार परिषदेतील माझे म्हणणे गांभीर्याने आणि जबाबदारीने मांडत आहे. आवाडे हे विधानपरिषदेसाठी निवडून यावेत, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आवाडे यांना उमेदवारी मिळाल्यास कॉँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही, याची खात्री आवाडेंना आहे, असेही अजित जाधव यांनी स्पष्ट केले.