शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यूट्रियंट्स’च्या साखर विक्रीतून एफआरपी -: १५ जुलैला जाहीर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:41 IST

‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बँक, अथर्व कंपनीचा निर्णय

कोल्हापूर : ‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा जाहीर लिलाव १५ जुलैला जिल्हा बँकेच्या मुख्यालयातच दुपारी एक वाजता होणार आहे. तशी जाहीर नोटीस गुरुवारी जिल्हा बँकेने प्रसिद्धीस दिली आहे.

जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्यूट्रियंट्स कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. कंपनीने २०१६-१७ या गळीत हंगामात १ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. ही तयार झालेली साखर जिल्हा बँकेकडे तारण ठेवून कंपनीने कर्ज उचलले होते. या कर्जातूनच शेतकऱ्यांची एफआरपी भागविण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पुढील एफआरपी भागविण्यास कंपनीने असमर्थता दर्शवल्याने न्यूट्रियंट्सचा जिल्हा बँकेसोबतचा भाडेकरार संपुष्टात आला होता.

यानंतर नव्याने भाडेतत्त्वाची निविदा प्रक्रिया राबवून अथर्व इंटरट्रेड कंपनीला हा कारखाना चालविण्यास देण्यात आला. यावेळी बँक आणि कंपनीने एकत्रितपणे ही ‘एफआरपी’ची रक्कम अदा करावी, असे ठरले होते. त्यानुसार कंपनी व बँक यांनी संयुक्तपणे प्रादेशिक साखर सहसंचालक, चंदगड तहसीलदार आणि शेवटी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकºयांची यादी मागणी केली होती. तथापि आजअखेर ही यादी मिळालेली नाही; पण शेतकºयांची होणारी आर्थिक अडचण ओळखून बँकेने कर्जापोटी तारण असलेली साखर विक्री करून एफआरपी भागविण्याचा निर्णय घेतला आहे.नुकसान होण्यापेक्षा शेतकºयांना फायदातारण म्हणून असलेली साखर ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने ती भिजून नुकसान होण्यापेक्षा ती विकली तर शेतकºयांना तरी तिचा लाभ होईल, असा विचार जिल्हा बँकेने केला आहे. म्हणून साखर विक्री जाहीर लिलावाद्वारे काढण्याची नोटीस काढल्याची माहिती जिल्हा बॅँकेने कळवली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने