शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ हाच मागील हंगामातील उसाचा अंतिम दर

By admin | Updated: September 10, 2015 01:23 IST

ऊस नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०-३० फॉर्म्युल्यानुसार काही साखर कारखान्यांचा अंंतिम दर ‘एफआरपी’पेक्षा कमी बसत असल्याने गत २०१४-१५ या हंगामासाठी ‘एफआरपी’ हाच अंतिम दर म्हणून निश्चित करावा, असा निर्णय बुधवारी मुंबईत झालेल्या ऊस नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अंतिम दर एफआरपीपेक्षा किती जादा देतो येतो, हे ठरविणे ऊस नियामक मंडळाचे मूळ काम आहे. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उत्पन्नातील ७०-३० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अंतिम दर ठरविणे गरजेचे होते; पण अनेक साखर कारखान्यांचा या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीपेक्षा कमी दर बसतो. त्यामुळे गत हंगामाचा अंतिम दर हा एफआरपीएवढाच निश्चित करण्यात आला. गत हंगामात साखरेचे दर पडल्यानंतर सरकारने हंगाम संपताना कच्च्या साखर निर्यातीचा निर्णय घेतला. त्याचा फायदा कारखान्यांना झाला नाही. या हंगामात केंद्र सरकारने अगोदरच ४० लाख टन कच्च्या साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा, जेणेकरून साखर कारखान्यांना कच्च्या साखरेचे नियोजन करता येईल. परिणामी बाजारात साखरेचे दर २८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाण्यास मदत होणार आहे. साखरेला दर चांगला मिळाला तर एफआरपी देण्यामध्ये कोणतीच अडचणयेणार नाही. यासाठी कच्च्या साखरेच्या निर्यातीचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी शिफारसही राज्य व केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराचा मुद्दा आता गौण झाला आहे; पण आघाडी सरकारने २५ किलोमीटरची अट कायम ठेवली आहे. महायुतीच्या सरकारने याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखाने लवकर सुरू करावेत, यासाठी मंत्री समितीची बैठक लवकर बोलवावी, अशी सूचनाही प्रतिनिधींनी बैठकीत केली. कृषिमूल्य आयोगानुसार १६० रुपये तोडणी-वाहतूक खर्च अपेक्षित आहे. एवढा कमी खर्च राहू दे; पण व्यावहारिक खर्च एफआरपीमधून वजा करावा. तोडणी-वाहतूक खर्चात मनमानी चालणार नाही, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले. थकलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह द्यावी, कमी दराने विकलेल्या साखरेची चौकशी करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव खत्री, साखर आयुक्त विपीन शर्मा, सहकार सचिव शैलेंद्रकुमार शर्मा, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी कुंटे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, पृथ्वीराज जाचक, आदी उपस्थित होते. ...अन्यथा गाळप परवाने न देण्याची शिफारस मागील एफआरपीप्रमाणे देय रक्कम दिल्याशिवाय आगामी हंगामासाठी गाळप परवाने देऊ नयेत, अशी शिफारसही या मंडळाने सरकारला केली आहे.