शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

उन्हाच्या चटक्याला फळांचा थंडावा

By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST

आठवडी बाजार : कलिंगड, द्राक्षांची आवक वाढली; भाजीपाला स्थिर; हापूस हजार रुपये डझन

कोल्हापूर : उन्हाची तीव्रता वाढत निघाल्याने कलिंगडे, द्राक्षांच्या मागणीबरोबर आवकही वाढली आहे. कडधान्य मार्केटमध्ये तूरडाळ व हरभरा डाळींच्या दरांत कमालीची वाढ झाली आहे. भाजीपाल्याचे दर गेल्या आठवड्यांच्या तुलनेत स्थिर असून, तुलनात्मक फळांच्या दरांतही फारशी चढउतार पाहावयास मिळत नाही. गेले आठ-दहा दिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. परिणामी गेले तीन महिने थंड असणाऱ्या फळ मार्केटमध्ये काहीशी तेजी आलेली आहे. बेळगाव, कारवार, बंगलोर येथून कलिंगडांची आवक होऊ लागली आहे. स्थानिक कलिंगडांची आवकही सुरू असून, अजून तमिळनाडू येथून कलिंगडांची आवक होत नसल्याने दर अजूनही स्थिर आहेत. काळी पाठ असलेले ‘किरण,’ हिरवे पट्टे असलेले ‘नामधारी,’ तर आकाराने लहान असलेल्या ‘शुगरबेबी’ कलिंगडांचे ढीग आपणाला बाजारात पाहावयास मिळत आहेत. द्राक्षांची आवक वाढली असली तरी दरात घसरण झाली आहे. टरबुजांची आवकही वाढली आहे. तूरडाळीच्या दरात किलोमागे तब्बल १२ रुपये, तर हरभरा डाळीच्या दरात आठ रुपयांची वाढ झालेली आहे. साखर, सरकी तेल, खोबरे यांसह इतर दर स्थिर आहेत. स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. वरणा, गवार वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्यांच्या तुलनेत कायम आहेत. किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक व पोकळा पेंढी पाच रुपये राहिली आहे.हापूस हजार रुपये डझन!गेले दोन आठवडे बाजारात देवगड व मालवण हापूस आंब्यांची आवक सुरू आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात एक हजार रुपये डझनाचा दर राहिल्याने अजून तरी हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळघरे बंद झाल्याने आवक कमी झाली आहे. परिणामी गूळ तेजीत आहे. प्रतिक्विंटल ३,६५० रुपये दर आहे. गवार पुन्हा कडाडलीगेल्या दोन महिन्यांत गवारीच्या दरात कमालीचा चढउतार झालेला आहे. १०० रुपये किलोंपर्यंत दर पोहोचला होता. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ४० रुपये किलो असणाऱ्या गवारीने पुन्हा सत्तरी गाठली आहे. कांदा, बटाटा स्थिरगेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा व बटाट्याच्या आवकेबरोबर दरही स्थिर राहिला आहे. घाऊक बाजारात कांदा १४ रुपये, तर बटाटा १० रुपये किलो दर राहिला आहे.