शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

आघाडीत ‘संशयकल्लोळ’ --

By admin | Updated: August 1, 2014 23:27 IST

पाडापाडीचे राजकारण : ‘ए. वाय.’ यांचे वक्तव्य काँग्रेसच्या संशयाला बळ देणारे

राजाराम लोंढे - कोल्हापूर [ एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने कॉँग्रेसला राष्ट्रवादीवरील संशयाला बळ मिळाले आहे. यामुळे आघाडीवर परिणाम होईल, हे म्हणणे धाडसाचे होणार असले तरी आगामी निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण जोरात होणार, हे मात्र निश्चित आहे. करवीर तालुक्यातील परिते येथील एका कार्यक्रमात एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने गेली आठ दिवस करवीर व राधानगरी तालुक्यांतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. ‘ए. वाय.’ यांचे वक्तव्य निमित्त आहे, गेली दहा वर्षे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर थेट हल्ला चढवत आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मनापासून पाटील यांना साथ दिली नाही. तरीही लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सर्वप्रथम आपली भूमिका जाहीर करत धनंजय महाडिक यांना पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा दिला नाही तर पूर्ण ताकदीने त्यांच्या विजयासाठी कंबर कसली. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर लगेच राष्ट्रवादीने भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक जाहीर करून कॉँग्रेसला डिवचले. आघाडीचा धर्म म्हणून प्रत्येकवेळी कॉँग्रेसने प्रामाणिक राहायचे आणि राष्ट्रवादीने सोयीचे राजकारण करायचे का? अशी विचारणा कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून होते. आघाडीच्या धर्माचा फायदा घ्यायचा आणि कॉँग्रेसला मदत करायच्या वेळी अंतर्गत विरोध करायचा, ही रणनीती राष्ट्रवादीची असल्याचा कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष आहे. राष्ट्रवादीचे हे राजकारण जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या वारंवार कानावर घातले आहे. त्यामुळे लोकसभेसह विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी त्यांची आहे. परिते येथील राष्ट्रवादीचे ‘भोगावती’चे संचालक कारंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील व ‘शेकाप’चे नेते एकाच व्यासपीठावर आले. यामध्ये ए. वाय. पाटील यांनी आमदार नरके यांचे तोंड भरून कौतुक करत आगामी निवडणुकीला शुभेच्छा दिल्या. यामुळे पी. एन. पाटील आक्रमक झाले. त्यांनी ए. वाय. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. या वादामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर फारसा परिणाम होणार नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण जोरात होणार हे मात्र निश्चित आहे. ए. वाय. पाटील यांनी केलेले वक्तव्य हे सभेतील चांगुलपणा आहे. त्या गावातील युतीचा संदर्भ घेऊन ते सहज बोलून गेल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. कॉँग्रेस आमचा मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला तर कान पकडण्याचा अधिकार त्यांना आहे. आमचा पक्ष छोटा आहे. कॉँग्रेस आमचा मोठा भाऊ आहे. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या स्थानिक बोलण्यावर दिल्लीत ठरत नसते. कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व आमचे नेते शरद पवार यांच्या पातळीवर सर्व निर्णय होत असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील अजून शाईही वाळलेली नसताना राष्ट्रवादीचे नेते आमच्या विरोधकांना मदत करण्याची भाषा करीत आहेत. आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे आघाडीच्या निष्ठेतून मदत केली, पण आता निष्ठा आणि ताकदही राष्ट्रवादीला दाखवून देऊ, असा इशारा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिला. परिते येथील कार्यक्रमात शिवसेनेच्या आमदारांना पाठिंबा देण्याची भाषा ए. वाय. पाटील यांनी केली. हे आता खपवून घेणार नाही. राधानगरी -भुदरगड मतदारसंघात आपणाला मानणारी ७५ हजार मते आहेत, याचा विसर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांना काँग्रेसची ताकद दाखवून देऊ. करवीर व राधानगरी तालुक्यांतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वादाला भोगावती साखर कारखान्याच्या राजकारणाची किनार आहे. कॉँग्रेसचे पारंपरिक शत्रू ‘शेकाप’ व आमदार चंद्रदीप नरके यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीने कारखान्यात सत्तांतर घडविले. हे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वादाचे मुख्य कारण आहे.