शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: September 11, 2014 23:17 IST

लाभार्थ्यांचे आंदोलन : विविध मागण्यांसाठी दिवसभर ठिय्या आंदोलन

इचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६०० रुपयांवरून मासिक तीन हजार रुपये अनुदान मिळावे, गरीब-श्रीमंत भेदभाव न करता ६५ वर्षांवरील नागरिकांना याचा लाभ द्यावा, लाभार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी यांची चौकशी होऊन त्यांना बडतर्फ करावे, आदी मागण्यांसंदर्भात तालुक्यातील लाभार्थ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.दरम्यान, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे या कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सायंकाळपर्यंत ठिय्या मारला. त्यानंतरही प्रांताधिकारी न आल्याने आंदोलकांनी शिवाजी पुतळा चौकात जाऊन रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनधारकांसह पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना पुन्हा प्रांत कार्यालयात आणले. त्याठिकाणी निवेदन देऊन ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. प्रांताधिकारी आल्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारले व यासंदर्भातील काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, कोरोची, तारदाळ, खोतवाडी, चंदूर, साजणी, पट्टणकोडोली, अतिग्रे, हेरले, रुकडी, आदी गावांतील वृद्ध, अंध, अपंग, निराधार आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा गांधी पुतळा, कॉँग्रेस समितीमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर आला. या मोर्चामध्ये मोहन यादव, बापूसाहेब मोरे, गंगुबाई सुतार, सूर्यकांत कांबळे यांच्यासह महिला, वृद्ध, निराधार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)