शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेकापचा ऊस दरासाठी मोर्चा

By admin | Updated: December 13, 2014 00:27 IST

चळवळीसाठी आवाहन : मताच्या राजकारणाची परंपरा कायम : पवार

कोल्हापूर : सरकार कोणतंही असो, सत्तेवर येण्यापूर्वी केवळ मताचे राजकारण केले जाते. राज्यात सत्तांतर झाले परंतु, राज्यात मताच्या राजकारणाचीच परंपरा कायम आहे, अशा शब्दांत माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर हल्लाबोल केला. आपल्या उसाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी चळवळीला तयार झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या मोर्चावेळी पवार बोलत होते. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा क ाढून निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या सांगतावेळी संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कारखान्यात ऊस घालायची वेळ येताच सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये साखरेचे दर खाली उतरतात. एकरकमी ‘एफआरपी’ देऊ शकत नाही, असा कांगावा कारखाने करतात. परंतु, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो. कोणताही राजकीय पक्ष मतं मागताना एक बोलतो आणि सत्तेत गेल्यावर एक बोलतो. सध्याचे सरकार तर ‘एफआरपी’बाबत चर्चा करायला तयार नाही. कारखाने ती जाहीर करायला तयार नाहीत. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार पवार-पाटील यांच्यासह केरबा पाटील, भारत पाटील, बाबूराव कदम, दिलीप जाधव, बाबासो देवकर, जनार्दन जाधव, पांडुरंग पाटील, सुशांत बोरगे, अजित देसाई, राजाराम धनवडे, पोपटराव घाटगे, आदींनी केले.