शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंचबाबत बाजू मांडू

By admin | Updated: September 10, 2015 01:27 IST

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश जेव्हा नियुक्त होतील, तेव्हा त्यांच्यासमोर राज्य सरकारतर्फे कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या मागणीबाबत बाजू मांडली जाईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून तो मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला होता. तसेच एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची ग्वाहीही ठरावात दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूरकरांना दिलेल्या ‘शब्दा’प्रमाणे आपली भूमिका पार पाडली आहे; परंतु मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सर्व न्यायाधीशांसमोर हा विषय ठेवला होता. कोल्हापूरला सर्किट बेंचची आवश्यकता नाही, असे त्यांचे मत आहे. सरकार आता नवीन मुख्य न्यायाधीश जेव्हा नियुक्त होतील, तेव्हा ही मागणी पुन्हा त्यांच्यासमोर मांडेल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे ही सरकारची स्पष्ट भूमिका असून ती पार पाडलेली आहे. यापुढेही ती पार पाडली जाईल. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा निर्णय झाला तेव्हा पुणे, अमरावती शहराचीही मागणी पुढे आली होती; परंतु मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूरसाठीचा ठराव केला, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)