शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय विद्यार्थ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 9, 2014 00:30 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : नकारात्मक गुणपद्धती रद्द करण्याची मागणी, विद्यार्थ्यांनीच केले नेतृत्व

कोल्हापूर : गेल्या कित्येक वर्षांपासून तेच मोर्चे, तेच नेतृत्व, मोर्चात दिसणारे तेच चेहरे, तेच शिष्टमंडळ आणि तीच चर्चा याला कंटाळलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना आज एका वेगळ्या परंतु शिस्तबद्ध मोर्चाचा अनुभव घ्यावा लागला. मोर्चा होता विद्यार्थ्यांचा आणि घोषणा होती अर्थातच.... ‘इन्कलाब झिंदाबाद’ ! शैक्षणिक क्षेत्रात गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या प्रश्नावरील या मोर्चाने शिस्तबद्धतेचे दर्शन घडविलेच, शिवाय मोठ्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरही दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संघटनांचे काम फक्त कागदोपत्रीच राहिले आहे, त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांवर मोर्चा काढल्याच्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु आज, सोमवारी कोल्हापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नावर मोर्चा काढला. अर्थात त्याचे नेतृत्वही विद्यार्थ्यांनीच केले. परीक्षेमधील नकारात्मक गुणाची पद्धत रद्द करावी, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजीबरोबरच मराठीतून दिल्या पाहिजेत, आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया आॅनलाईनऐवजी प्रत्येक आयटीआयमध्येच करावी, विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी विषयजोड प्रश्नपत्रिका व एकत्रित पासिंग पद्धत बंद करून विषयवार स्वतंत्र प्रश्नपत्रिका व पासिंग पद्धत लागू करावी, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून निदेशकांच्या जागा त्वरित भराव्यात, नापास विद्यार्थ्यांच्या तातडीने फेरपरीक्षा घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.कळंबा येथील आय.टी.आय.च्या मुख्य कार्यालयापासून मोर्चातील सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी पायी चालत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले. ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘लय लय भ्रष्टाचार, लय लय अत्याचार’ या दोन घोषणांनी लक्ष वेधून घेतले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर पोलिसांनी अडविला. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत संबंधितांना माहिती कळविण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले. स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाच्या झेंड्याखाली निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व दत्ता चव्हाण, सुभाष जाधव, उमेश देशमुख, निखील कांबळे, ओमकार रेडेकर, रोहित कडलगे, अक्षय सुतार, भारत कांबळे, वैभव मोहिते, राहुल पाटील, गणेश शिंदे, रामदास जाधव, उद्धव चौगुले, तानाजी आगळे, रोहित मानकर, अक्षय गोसावी, विशाल गुरव, प्रियंका कांबळे, धनश्री पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)इन्कलाब झिंदाबाद...आय.टी.आय. परीक्षेमधील नकारात्मक गुण देण्याची पद्धत रद्द करावी, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजीबरोबरच मराठीतून दिल्या पाहिजेत, आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया आॅनलाईनऐवजी प्रत्येक आयटीआयमध्येच करावी, विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी विषयजोड प्रश्नपत्रिका व एकत्रित पासिंग पद्धत बंद करून विषयवार स्वतंत्र प्रश्नपत्रिका व पासिंग पद्धत लागू करावी, निदेशकांच्या जागा त्वरित भराव्यात, नापास विद्यार्थ्यांच्या तातडीने फेरपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.नकारात्मक गुणपद्धतीचा फटका गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे केवळ आठ टक्के निकाल लागला होता. भविष्यातही असाच फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे ही पद्धत रद्द केली पाहिजे. त्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत.- नीलेश नाईकवडे, विद्यार्थी नकारात्मक गुणपद्धती अत्यंत बिनडोकपणे केंद्र सरकारने अवलंबली आहे. शिक्षक, प्राध्यापकांनी विरोध केला तरीही तो जुमानला नाही. विद्यार्थ्यांना मराठीत शिकविले जाते आणि प्रश्नपत्रिका मात्र इंग्रजीत दिल्या जातात, हे चुकीचे आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्था बंद पाडण्याचा हा डाव आहे.- प्रा. सुभाष जाधव