शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज प्रकरणे मंजूर न करणाऱ्या बॅँकांविरोधात शुक्रवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:45 IST

शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणांना बॅँकांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ८) ११.३० वाजता स्टेशन रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदनाद्वारे दिला.

ठळक मुद्देकर्ज प्रकरणे मंजूर न करणाऱ्या बॅँकांविरोधात शुक्रवारी मोर्चा शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा निवेदनाद्वारे इशारा

कोल्हापूर : शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणांना बॅँकांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ८) ११.३० वाजता स्टेशन रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदनाद्वारे दिला.दुपारी महामंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन सादर करून चर्चा केली. संजय पवार म्हणाले, राष्ट्रीयकृत बॅँकांकडून महामंडळाची कर्जप्रकरणे करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यावर कारवाई करावी. यावर जिल्हाधिकारी देसाई यांनी यासंदर्भात बॅँक प्रतिनिधींची तातडीने बैठक घेतली जाईल, तसेच ज्या बॅँका सहकार्य करत नाहीत त्यांच्याविरोधात त्यांच्या वरिष्ठांना कळविले जाईल, असे सांगितले.निवेदनात म्हटले आहे, की शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण, शिक्षण व व्यवसायामध्ये उन्नती होण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या. तसेच त्याची अंमलबजावणीही तातडीने सुरू केली. त्यातूनच अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठा समाजातील नवीन उद्योजक बनावेत या हेतूने बिनव्याजी कर्जयोजना जाहीर केली.

त्याचबरोबर बॅँकांना विश्वास बसण्यासाठी पत हमीसुद्धा शासनाने घेतली; परंतु अनेक राष्ट्रीयकृत बॅँका व को- आॅपरेटीव्ह बॅँक्स या आदेशाचे पालन न करता मराठा तरुणांना सहकार्य करत नाहीत. उलट हिन वागणूक देऊन, अनेक कारणे सांगून त्यांची प्रकरणे मंजूर करत नाहीत. याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. तरी कृपया शासनाचा आदेश न पाळणाऱ्या व ज्यांची कागदपत्रे कायदेशीर आहेत, अशा मराठा तरुणांना सहकार्य न करणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कडक समज द्यावी.शिष्टमंडळात रवी चौगुले, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, बाजीराव पाटील, कृष्णात चौगले, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, हर्षल सुर्वे, राजू यादव, विराज पाटील, मंजीत माने, शुभांगी पोवार, दिनेश परमार, धनाजी यादव, आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर