शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच ‘राष्ट्रवादी’ची गटबाजी

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

इचलकरंजीतील राष्ट्रवादीचे राजकारण : स्वतंत्र बैठका घेऊन आरोप-प्रत्यारोप

इचलकरंजी : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी पक्षातील वाद संपुष्टात यावेत, अशी भूमिका घेऊन आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना गटबाजीचे आज, रविवारी दर्शन घडले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहर कार्यालयात कारंडे गटाने, तर नगरपालिका कामगार संघटनेच्या कार्यालयात जांभळे-माने गटाने बैठक घेऊन परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप करीत टीकाटिप्पणी केली.राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच गटबाजी आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यामध्ये नगरसेवक विठ्ठल चोपडे यांना तात्पुरते निलंबित करा, अशी जिल्हाधिकाऱ्यांना जांभळे-माने गटाने शिफारस केली. तर नगरपालिकेतील पक्षप्रतोद रवींद्र माने यांना पक्षातून निलंबित करावे, असे आदेश कारंडे गटाने पक्षश्रेष्ठींकडून मिळविले. या घटनेमुळे गटबाजीची तीव्रता वाढली. माने यांच्या निलंबनाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून स्थगिती घेण्यात आली. त्यानंतर मुंबई येथे प्रदेश कार्यालयात तटकरे व अजित पवार यांच्यासमोर कारंडे व जांभळे-माने गटांनी आपआपली बाजू मांडली आणि निलंबनाचा विषय स्थगित राहिला.इचलकरंजीमध्ये शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी व विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी अशा दोन समित्या आहेत. या दोन्ही समित्यांकडील पदाधिकारी व कार्यकारिणी यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी पक्षश्रेष्ठींची अपेक्षा असल्याने रविवारी इचलकरंजी येथे निवडणूक उपअधिकारी अनिल साळुंखे व भैया माने हे आले होते. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी कारंडे गटाने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहर कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बोलावली. इचलकरंजीतील पक्षाचे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार मदन कारंडे यांना द्यावेत, असे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीसाठी या गटाचे माधुरी चव्हाण, शुभांगी माळी व लतीफ गैबान हे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यानंतर या दोन्ही पदाधिकाऱ्यांन्5ाी कामगार संघटनेच्या कार्यालयात जाऊन तेथे जांभळे-माने गटाच्या समर्थकांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीत नगरसेवक भाऊसाहेब आवळे, पक्षप्रतोद रवींद्र माने, महेश ठोके, आदींची भाषणे झाली. या गटातर्फे माजी खासदार निवेदिता माने व माजी आमदार अशोकराव जांभळे यांना पक्षाचे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार देण्यात आले. बैठकीत बोलताना माने यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसने आमचा योग्य तो विचार केला नाही, तर पूर्वाश्रमीचा कुंभार, कदम व माने गट एकत्रित येऊन ढाल-तलवार हाती घेण्यात येईल आणि येणाऱ्या सर्व निवडणुका बंडखोरी करून निवडण्यात येतील, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)गटबाजीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणारअनिल साळुंखे व भैया माने म्हणाले, इचलकरंजीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीमुळे येथे पक्षाची ताकद विखुरली जात आहे. आता पक्षांतर्गत निवडणुका होणार असल्याने गटबाजी विसरून सर्वांनी एकत्रित यावे आणि निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीनेच आम्ही प्रयत्न करीत आहोत. या दोन्ही बैठकांमधील अहवाल लवकर पक्षश्रेष्ठींना देण्यात येईल आणि त्याबाबतचा निर्णय पक्ष घेईल.