शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड येथील सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ ‘वंचित’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:04 IST

झारखंड राज्यात चोरीच्या आरोपावरून तरबेज अन्सारी ऊर्फ सोनू याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून रात्रभर मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी वंचिन बहुजन आघाडी व ‘एमआयएम’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी

कोल्हापूर : झारखंड राज्यात चोरीच्या आरोपावरून तरबेज अन्सारी ऊर्फ सोनू याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून रात्रभर मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी वंचिन बहुजन आघाडी व ‘एमआयएम’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. ‘वंचित’ व ‘एमआयएम’चे झेंडे घेतलेले कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी काही काळ जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.

मोर्चा मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निदर्शने झाल्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, झारखंड येथील तबरेज अन्सारी याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून घालून रात्रभर मारहाण केली. त्यानंतर त्याला अर्धमेल्या अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनीही त्याला मारहाण केली. यानंतर गंंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

देशात सध्या अशा घटनाबाह्य गोष्टी आणि धर्मांध शक्तींचा वाढता उद्रेक याचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत आहे. देशात मुस्लिमांना तसेच दलितांवर गाईच्या नावावर तसेच एका धार्मिक नाऱ्यासाठी मुस्लिम समूदायावर बीफ खाल्ल्याचा व चोरीचा मुद्दा घेऊन मारहाण केली जाते. अशा कट्टर धर्मांध लोकांमुळे भारतीय लोकशाही व एकता विविधतेतून एकात्मता धोक्यात आलेली आहे.आंदोलनात ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला, उत्तम वाघवेकर, दिगंबर सकट, प्रेमकुमार माने, सुशीलकुमार कोल्हटकर, अस्मिता दिघे, ‘एमआयएम’चे इम्रान सनदी, शाहिद शेख, युवराज शिंदे, कादर मलबारी, सचिन अडसुळे आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर