शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By admin | Updated: November 1, 2015 00:57 IST

प्रलंबित मानधनाची मागणी : दोन दिवसांत जमा होणार - प्रशासन

कोल्हापूर : तीन महिन्यांचे प्रलंबित मानधन मिळावे, निवडणुकीतील कामे लावू नका, आदी मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. बहुतांश तालुक्यातील तीन महिन्यांचे मानधन जमा झाले आहे, तांत्रिक अडचणीमुळे राहिलेले मानधन येत्या दोन दिवसांत सेविका व मदतनीस यांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे आश्वासन महिला, बालकल्याण विभागाच्यावतीने मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. जुलैपासूनचे मानधन मिळावे, सेविका व मदतनिसांना सेवा समाप्तीनंतर द्यावयाच्या पेन्शनबाबत पूर्वलक्षी प्रभावाने २००८ पासून मिळाली पाहिजे, त्याची अंमलबजावणी करा. खासगी शाळांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. याबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी व अशा प्रकारच्या खासगी बालवाड्या बंद करण्याबाबत आदेश द्यावेत, किमान वेतन कायदा लागू करा, केंद्र शासनाने मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, नियमबाह्य कामाची सक्ती करू नये, मतदार पुनर्नोंदणीकामी ‘बीएलओ’ या कामासाठी अंगणवाडी सेविकांना सक्ती केली जाते ती तत्काळ थांबवावी, यावर्षीची भाऊबीज लगेच मिळावी, आदी मागण्यांसाठी युनियनचे प्रमुख आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. ‘कोण म्हणते देत नाही..., मानधन आमच्या हक्काचे ....., यांसह राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी सेविका व मदतनीस यांनी परिसर दणाणून सोडला. आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत सप्टेंबरअखेरचे मानधन अदा केलेले आहे, काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे प्रलंबित असलेले मानधन येत्या दोन दिवसांत खात्यावर जमा होईल. गत दिवाळीची भाऊबीजही संबंधितांच्या खात्यावर जमा झाल्याचे महिला, बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी जयश्री पाटील, सरिता कंदले, अर्चना पाटील, शोभा भंडारे, आरती लाटकर, शमा पठाण, आदी उपस्थित होते.