शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्र धावले, माणुसकीचा धागा केला घट्ट; रस्त्यावर बाटल्या गोळा करून जगणाऱ्या वर्गमित्राला दिलं नवं जीवन

By विश्वास पाटील | Updated: July 18, 2022 11:35 IST

विवेक अत्यंत हुशार. कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगले सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून व आर्थिक फसवणुकीतून वैफल्य आले. मनस्थिती बिघडली.

विश्वास पाटीलकोल्हापूर : सख्ख्या भावालाही ओळख न दाखविणाऱ्यांची संख्या समाजात वाढू लागली असताना रस्त्यावर काचेच्या बाटल्या गोळा करून पोट भरणाऱ्या व जेम्सस्टोन व्यापारी संकुलाच्या पायरीवर गेली अनेक दिवस झोपणाऱ्या शाळेतील ३३ वर्षांपूर्वीच्या वर्गमित्राला नवे जीवन देण्याचा प्रयत्न येथील सेंट झेविअर्स शाळेतील १९८९ च्या बॅचमधील मित्रांनी सुरू केला आहे. विवेक चिटणीस (वय ४९, रा. मूळ राजारामपुरी), असे त्या मित्राचे नाव आहे. सध्या त्यांना सावली केअर सेंटरमध्ये ठेवले आहे.विवेकचा शोध आणि त्यांना पुन्हा जीवनात उभे करण्याची मित्रांची धडपड याला समाजाने सलामच करायला हवा. मित्रच मित्रासाठी काय करू शकतात याचे हे जगात भारी उदाहरण कोल्हापूरने घालून दिले आहे. त्यातून माणुसकीचा धागाच अधिक बळकट झाला. हे सगळे रविराज निंबाळकर, अमर क्षीरसागर, तुषार पाटील, अभिजित भोसले, शिरीष पाटील, प्रदीप मुदलियार व इतर मित्रांनी मित्रासाठी केले. जे घडले ते सारेच अचंबित करणारे.विवेक चिटणीस हे सेंट झेविअर्सचे माजी विद्यार्थी. वर्गात अत्यंत हुशार. त्यांचे आई व भाऊ सध्या अमेरिकेत. विवेक स्वत: कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगले सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून व आर्थिक फसवणुकीतून वैफल्य आले. मनस्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खावून जगायचे असा दिनक्रम.चार-पाच दिवसांपूर्वी रविराज निंबाळकर यांना ते दाभोळकर कॉर्नरला पाठीवर पोते घेऊन बाटल्या गोळा करताना आढळले. त्यांचा विश्वासच बसला नाही. त्यांनी शाहूपुरी पोलिसांकडे जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले. ते बॅचच्या ग्रुपवर शेअर केले. शुक्रवारी दुपारी विवेक दामिनी हॉटेलच्या दारातून निघालेले तुषार पाटील यांना दिसले. त्यांनी त्यांची पाठ सोडली नाही. कनाननगरच्या कोपऱ्यावर थांबल्यावर त्यांनी मोबाइलवर फोटो घेतले व ते ग्रुपवर शेअर केले.पुढच्या काही मिनिटांत आठ-दहा मित्र लगेच गोळा झाले. रविराज यांनी विवेकशी संवाद साधल्यावर त्यांनी सगळ्यांना ओळखले. हस्तांदोलनही केले. लगेच त्याला मित्रांनी खाऊ घातले. मानसिक आधार दिला. आधीच नियोजन केल्यानुसार सावलीमध्ये नेऊन दाखल केले. मित्रांनीच त्याच्यासाठी नवे कपडे घेऊन दिले. त्यांच्यासाठी आता नोकरीचा शोध सुरू आहे. एक भरकटलेले आयुष्य पुन्हा मित्रप्रेमामुळे नव्याने फुलत आहे.

डोळ्यात पाणी...तुम्ही माझ्या आयुष्यात देव म्हणून आलात..नाही तर मी जीवनाला पार वैतागलो होतो रे..पंचगंगा नदीत उडी घेऊन मी जीवन संपवणार होतो..उद्याचा माझा दिवस शेवटचाच होता अशा भावना मित्र भेटल्यावर विवेकने व्यक्त केल्या आणि सर्वच वर्गमित्रांच्या डोळ्यांत पाणी आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर