शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

मुश्रीफ म्हणाले, भाजपमुळेच थेट पाईपलाईन रखडली. राजकारणबाजूला ठेवून त्यांनी सर्व शासकीय परवानगी मिळवून दिल्या पाहिजे होत्या. आमदार चंद्रकांत जाधव ...

मुश्रीफ म्हणाले, भाजपमुळेच थेट पाईपलाईन रखडली. राजकारणबाजूला ठेवून त्यांनी सर्व शासकीय परवानगी मिळवून दिल्या पाहिजे होत्या. आमदार चंद्रकांत जाधव यांनी उभारलेले कार्यालय नक्कीच गोरगरिबांना आधार ठरेल. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे ठरेल. परदेशातून २० हजार लोक राज्यात आल्याचे संकेत असून सर्वांनी १५ दिवस खबरदारी घ्यावी.

चौकट

जे बोलतो ते सत्यात उतरवतो : पालकमंत्री पाटील

राज्यात भाजप सरकार असताना कोल्हापूरसाठी निधी मिळाला नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तातडीने ४७ कोटींचा निधी आणला. थेट पाईपलाईनचे काम मे महिन्यांत पूर्ण होणार आहे. विकासाच्या दृष्टिकोन ठेवून काम करत आहोत. कधीही चुकीचे आश्वासने दिली नाहीत. जे बोलतो ते सत्यात उतरवतो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आवर्जून सांगितले. चंद्रकांत जाधव व्हिजन असणारे आमदार आहेत. त्यांना सर्व बाबतीतील ज्ञान आहे. त्यांनी उभारलेल्या कार्यालय नागरिकांना हक्काचे कार्यालय ठरेल, असेही ते म्हणाले.

चौक़ट

ही कसली सुप्त लाट

भाजपच्या एका नगरसेवकाच्या कार्यपुस्तिका प्रकाशनावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बिहारप्रमाणे कोल्हापूर महापालिकेतीही सुप्त लाट असल्याचे म्हटले. मात्र, पदवीधर मतदारसंघाचे त्यांनी १२ वर्षे प्रतिनिधीत्व केले तेथे सुप्त लाट करू शकले नाहीत. महापालिकेत काय सुप्त लाट आणणार, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

चौकट

माजी आमदार मालोजीराजे पुन्हा सक्रिय

माजी आमदार मालोजीराजे यावेळी आवर्जुन हजेरी लावली. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केल्यास रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, असेही त्यांनी मनाेगत व्यक्त केले. त्यांना मानणारे आजी-माजी नगरसेवकही कार्यक्रमाला उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मुश्रीफांनीही राजे पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचे म्हटले.

फोटो : ०३०१२०२० कोल मुश्रीफ न्यूज

ओळी : कोल्हापुरातील आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनाला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

छाया : नसीर अत्तार