शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

पात्र उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी शुक्रवारी मुलाखती

By admin | Updated: June 13, 2015 00:49 IST

संरक्षण सेवेची संधी : नाशिक येथे एस.एस.बी. प्रशिक्षण वर्ग

कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी २३ जून ते २ जुलै २०१५ या कालावधीत नाशिक येथे विनामूल्य एस. एस. बी. प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बझार रोड, कसबा बावडा येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गासाठी सैन्यदलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रीय तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण झालल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या युवकांना सशस्त्र सैन्यदलाकडून एस. एस. बी. परीक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. या वर्गाचा कालावधी २३ जून ते २ जुलै असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजनाची सोय केली आहे. तरी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींसह मुलाखतीस हजर राहावे, असे या पत्रकात म्हटले आहे.