शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा; प्रॅॅक्टिस ‘अ’कडून झुंजार क्लबचा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:52 IST

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत इमॅन्युअलच्या दोन, तर कैलास पाटीलच्या एका गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने झुंजार फुटबॉल क्लबचा, तर पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा पराभव केला.

ठळक मुद्दे सतेज चषक फुटबॉल स्पर्धा; प्रॅॅक्टिस ‘अ’कडून झुंजार क्लबचा धुव्वापाटाकडील‘ब’कडून खंडोबा ‘ब’ पराभूत

कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत इमॅन्युअलच्या दोन, तर कैलास पाटीलच्या एका गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने झुंजार फुटबॉल क्लबचा, तर पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा पराभव केला.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा १-० असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन केले.

त्यात ‘पाटाकडील’क डून शुभम चव्हाण, यश देवणे, साईराज पाटील, पृथ्वी चव्हाण, इम्रान मणेर यांनी, तर ‘खंडोबा’कडून स्वप्निल पाटील, सत्यम घाटगे, चेतन डोंगरे, मंदार पाठक यांनी खोलवर चढाया करीत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात पूर्वार्धातील जादा वेळेत ‘पाटाकडील’कडून यश देवणे याने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ‘खंडोबा’कडून सामन्यात बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. अखेरीस हा सामना पाटाकडील ‘ब’ने १-० असा जिंकला.दुपारच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टिस ‘अ’ने नवख्या झुंजार क्लबचा ३-० असा धुव्वा उडविला. यात सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला इमॅन्युअलने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘झुंजार’कडून साईप्रसाद मोरबाळे, दीपराज राऊत, प्रसाद पाटील, निखिल साळोखे यांनी बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण त्यांचा ‘प्रॅक्टिस’च्या बचावफळीपुढे टिकाव लागला नाही.

उलट २६ व्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील याने गोलची नोंद केली. यानंतर ५२ व्या मिनिटास इमॅन्युअलने वैयक्तिक दुसरा व संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगले यांनी वेगवान चाली रचल्या. त्यात कैलासने मिळालेल्या संधीवर संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. अखेरपर्यंत ही गोलसंख्या कायम ठेवत हा सामना ‘प्रॅक्टिस’ने ३-० असा नवख्या झुंजार क्लबचा धुव्वा उडविला. 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर