शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘मातोश्री’तील वृद्धांची वर्षभर मोफत दाढी-केस;शामराव शिंदे फौंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:05 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माजी महापौर अ‍ॅड. शामराव शिंदे फौंडेशनच्यावतीने नववर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : माजी महापौर अ‍ॅड. शामराव शिंदे फौंडेशनच्यावतीने नववर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांचे वर्षभर मोफत दाढी-केस केले जाणार आहे. वृद्धाश्रमातील पुरुष व महिलांच्या हाता-पायाची वाढलेली नखेही कापून एकूणच त्यांना नीटनेटके ठेवली जाणार आहे. त्याशिवाय ‘सीपीआर’ रुग्णालयाच्या अपघात विभागाला चहा व कॉफीचे मशीनही दिले जाणार आहे.अ‍ॅड. शामराव शिंदे यांनी सहकार चळवळ केवळ वाढविली नाही तर ती बळकट करण्याचे काम केले. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरातील नामांकीत बँका, पतसंस्थांना घरघर लागली असताना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संस्था अधिक सक्षम झाल्या. त्यांनी सहकारात काम करत असताना सामाजातील वंचितांना सढळ हाताने मदत करण्याची भूमिका नेहमीच राहिली. याच जाणीवेतून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी एकत्रित येत बारा वर्षांपूर्वी ‘अ‍ॅड. शामराव शिंदे फौंडेशन’ची स्थापना केली. अनेक फौंडेशन आहेत, पण त्यांच्याकडे सामाजिक दृष्टीचा अभाव दिसतो. शिंदे फौंडेशनने गेले बारा वर्षे समाजातील शोषित, वंचित व दुर्बल घटकांसाठी झोकून देऊन काम केले आहे. गेल्यावर्षी सीपीआरमधील रक्तपेढीला रक्त संकलन करण्यासाठी अत्याधुनिक खुर्च्या दिल्या. यावर्षी काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा मनोदय होता.वृद्धाश्रमातील पुरुषांना त्यांची दाढी केस करण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. वयोमानानुसार ते थकल्याने त्यांना चालत जाऊन दाढी, केस करता येत नाहीत. त्यामुळे अनेक महिने केस, दाढी तशीच असते, परिणामी त्यांच्या एकूणच मानसिकतेवर परिणाम होतो. यासाठी ‘शिंदे फौंडेशन’चे सुमित्रादेवी शिंदे, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, सुनील करंबे आदींनी पुढाकार घेऊन नववर्षावर एक चांगला संकल्प केला आहे. नागदेववाडी (ता. करवीर) येथील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथील लोकांचे वर्षभर दाढी व केस करण्याचा संकल्प केला. त्याची शुक्रवार पेठेतील राजू सांगावकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. केवळ दाढी, केस न करता त्यांच्या हात व पायाची वाढलेली नखेही कापली जाणार आहेत.दोनशेजणांना ‘लेझीम’चे प्रशिक्षणलेझीम, दांडपट्ट्यासह इतर खेळ काळाच्या पडद्याआड निघाले आहेत. या खेळांची माहिती आजच्या पिढीला व्हावी, त्याचे शारीरिक महत्त्व कळावे, यासाठी फौंडेशनच्यावतीने लेझीमचा प्रशिक्षण वर्ग घेतला. यामध्ये दोनशेहून अधिक लोक सहभागी झाले.