शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:17 IST

राज्य शासनाकडून हस्तांतरण; इमारतीची डागडुजी, वैद्यकीय उपकरणांबाबतचा प्रस्ताव सादर

  आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२४ : राज्य शासनाने कोल्हापुरातील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालय (ईएसआयसी) हे राज्य कर्मचारी बिमा निगमकडे (ईएसआय कॉर्पोरेशन) हस्तांतरीत केले आहे. यावर ईएसआय कॉर्पोरेशनच्या सूचनेनुसार या रुग्णालय इमारतीची डागडुजी,आवश्यक वैद्यकीय उपकरणे, आदींबाबतच्या खर्चाचा प्रस्ताव स्थानिक व्यवस्थापनाने गेल्या दहा दिवसांपूर्वी सादर केला आहे. त्यामुुळे आता हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ईएसआयसी रुग्णालय हे पूर्ण क्षमतेने सुरू होण्यात निधीची उपलब्धता, बांधकाम पूर्णत्वाचा दाखल, राज्य शासनाकडून अडलेले हस्तांतरण आदी अडथळे होते. यातील सर्वात महत्त्वाचा असलेला हस्तांतरणाचा अडथळा गेल्या दोन महिन्यांपूर्वी दूर झाला आहे.

राज्य शासनाने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे रुग्णालय दिल्लीतील ईएसआय कॉर्पोरेशनकडे हस्तांतरीत केले आहे. यानंतर संबंधित कार्पोरेशनच्या बांधकाम विभागातील पथकाने कोल्हापुरातील या रुग्णालयाची इमारत, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पाहणी करुन डागडुजी आणि अपुऱ्या कामांची माहिती घेतली आहे.

या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी बिबेवाडी (जि. पुणे) येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल झोडे यांच्यावर गेल्या आठवड्यात सोपविली आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि अन्य साहित्य उपलब्धतेबाबतच्या सुमारे दहा कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने कार्पोरेशनला सादर केला आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याबाबत गेल्या १७ वर्षांपासून विमाधारक कामगारांची प्रतिक्षा आता संपणार असल्याचे दिसत आहे.

कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाचे राज्य शासनाकडून कार्पोरेशनकडे हस्तांतरण झाले आहे. यानंतर कार्पोरेशनच्या पथकांनी दोनवेळा याठिकाणी भेट दिली आहे. रुग्णालय सुरू होण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊले पडत आहेत.

- संदीपकुमार,व्यवस्थापक, ईएसआयसी कोल्हापूर

या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, औषधे, निधीची उपलब्धता याबाबतचा प्रस्ताव ईएसआय कॉर्पोरेशनला गेल्या दहा दिवसांपूर्वी सादर केला आहे. इमारतीच्या डागडुजीसाठीच्या खर्चाचा प्रस्ताव कार्पोरेशनच्या बांधकाम विभागाने दिला असल्याचे समजते. लवकरात लवकर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. सुनिल झोडे,अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयसी रुग्णालय