शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरगावकर ट्रस्टमार्फत दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, या भावनेतून कोल्हापुरातील कोरगावकर ...

कोल्हापूर : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, या भावनेतून कोल्हापुरातील कोरगावकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यामार्फत सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते या वृक्षांच्या रोपांचे वाटप झाले.

सामाजिक जाणीव आणि पर्यावरण जपणुकीचे भान ठेवून गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील कोरगावकर ट्रस्टमार्फत औषधी वृक्षांची मोफत रोपटी लागवडीसाठी वाटप केली जातात. यावर्षीही सुमारे दहा हजार रोपांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर ट्रस्टच्यावतीने कोरगावकर पेट्रोल पंप येथे मोफत अन्नछत्राचाही हजारो गरजूंना लाभ मिळत आहे.

कोरोनाच्या काळात प्रामुख्याने जाणवलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याचबरोबर औषधी वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती ट्रस्टचे राज कोरगावकर यांनी दिली. या विनामूल्य वृक्षरोप वाटप कार्यक्रमात हलदार यांनी झाडे केवळ न लावता ती जगवली पाहिजेत, असे आवाहन केले तसेच संकटकाळात गरिबांची भूक भागवणारा अन्नछत्राचा उपक्रमही कौतुकास्पद असल्याचे हलदार यांनी सांगितले.

यावेळी एच. पी. सी. एल.चे जनरल मॅनेजर ध्रुव कपिल, कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, राज कोरगावकर, आकाश कोरगावकर, अनिकेत कोरगावकर, ओम कोरगावकर आदींसह शिरोली येथील कोरगावकर पेट्रोल पंप येथील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

--------------------------------

फोटो : 29072021-kol-korgaonkar trust.jpg

फोटो ओळी : कोल्हापुरातील कोरगावकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यामार्फत एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. यावेळी राज कोरगावकर उपस्थित होते.

(संदीप आडनाईक)

290721\29kol_1_29072021_5.jpg

फोटो : 29072021-kol-korgaonkar trust.jpgफोटो ओळी : कोल्हापूरातील कोरगांवकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगांवकर पेट्रोलपंप यांच्यामार्फत एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. यावेळी राज कोरगांवकर उपस्थित होते.