शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

मुक्त विद्यापीठाच्या निकालात चुकांचा मुक्त संचार

By admin | Updated: August 31, 2015 00:08 IST

शेकडो विद्यार्थ्यांना फटका : अंतिम वर्षात शिकणारे प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता, तक्रारदारांना दीड महिन्यानंतरही सुधारित निकाल मिळालेला नाही

संदीप खवळे - कोल्हापूरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मे २०१५ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर होऊन दीड महिना झाला़ या निकालात बी़ ए़ आणि बी़ कॉम.च्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत़ अनेक निकालपत्रकांमध्ये काही विषयांचे गुणच दाखविलेले नाहीत़ असाईनमेंटचे गुणच दिलेले नाहीत़ सुधारित निकालासाठी दीड महिन्यांपूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अजूनही सुधारित निकाल मिळालेला नाही़ परिणामी बी़ ए़ आणि बी़ कॉम.च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशाची गोची झाली आहे़बी़ ए़ आणि बी़ कॉम.च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या कोल्हापूर शहरातील एकाच केंद्रातील १४ विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे़ जिल्ह्याचा विचार केला असता ही संख्या शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे़ मुक्त विद्यापीठाचे कोल्हापूर विभागीय केंद्र आणि नाशिक येथील मुख्य कार्यालयाशी ई-मेलद्वारे आणि लेखी पत्रव्यवहार करूनही या विद्यार्थ्यांना निकालपत्रक मिळालेले नाही़ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुधारित निकालपत्रक न मिळाल्यामुळे शिवाजी विद्यापीठाची एम़ बी़ ए.ची प्रवेश परीक्षा देता आलेली नाही़ मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याची मुदतही संपून गेली आहे़ त्यामुळे लेखी अर्ज देण्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही़ लेखी अर्जानंतरही विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांनी गुणपत्रिका मिळणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्ष वायाच जाण्याची भीत् विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका का मिळत नाहीत, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे़ ़मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवरील तक्रार निवारण आॅप्शनमध्ये विद्यार्थ्यांना निकालासंबंधीच्या तक्रारींचा तपशील मांडण्याची सोय आहे़ हा आॅप्शन बारमाही खुला आहे़ निकालातील चुका दुरुस्त करून संबंधित केंद्रांना निकालपत्रके देण्यात आली आहेत़ विविध शाखांतील तृतीय वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोजकेच निकाल प्रलंबित आहेत़ सुधारित निकाल करण्याचे काम सुरू आहे़ कुंभमेळ्यामुळे नाशिकमधील काम ठप्प आहे़ लवकर या विद्यार्थ्यांना सुधारित निकालपत्रके देण्यात येतील. - डॉ़ अर्जुन घाटुळे, परीक्षा नियंत्रक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक