शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीस अधिकारीच जबाबदार : आयडीबीआयच्या अधिकाऱ्यांची सोमवारी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:44 IST

पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली;

ठळक मुद्देबोजा नोंद न करता पीक कर्जवाटपपरंतु या प्रकरणी गावाची नाहक बदनामी होत असल्याची ग्रामस्थांची भावना

- विश्वास पाटील ।कोल्हापूर : पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु कर्जाची नोंद संबंधित शेतकºयांच्या सातबारा उताºयावर झालेलीच नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल होण्याची शक्यताही धूसर आहे.

या प्रकरणी बँकेच्या वरणगे (ता. करवीर) शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे व बँक अधिकारी मनोजकुमार बोरसे यांना चौकशीसाठी सोमवारी (ता. २२) बोलाविले असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.या प्रकरणी म्हालसवडे येथील एकाच प्रकरणात राजाराम दादू पाटील व सुमित राजाराम पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. २३ लाखांच्या फसवणूकप्रकरणी एकाच कुटुंबातील सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.पीक कर्ज व्यवहारात शेतकºयाला तशी सहजासहजी फसवणूक करता येत नाही.

कारण त्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. कर्जदार शेतकºयाने बँकेकडे कर्जमागणी केली व कर्ज मंजूर झाले तर बँक संबंधित शेतकºयाच्या सातबारा उताºयास इतर हक्कात नोंद करून आणावी, असे पत्र देते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्यांचे पीक व इतर मध्यम मुदतीचे कर्ज एक लाखापेक्षा जास्त आहे, अशाच कर्जाची शेतकºयाच्या सातबारा उताºयावर नोंद होते. तसे हजार-दीड हजार रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. तलाठ्याने दाखला दिल्यानंतरच बँक संबंधिताच्या खात्यावर पैसे वर्ग करते. परंतु या प्रकरणात बहुतांश प्रक्रिया धाब्यावर बसवूनच कर्जवाटप झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.आरळेचा संतोष पाटील फरारया प्रकरणातील सूत्रधार असलेल्या संतोष बळवंत पाटील (रा. आरळे) हा फरार आहे. राजाराम पाटील यांची एकत्रित कुटुंबाची १५ एकर जमीन आहे. त्यातील राजाराम पाटील याच्या नावावर प्रत्यक्षात साडेचार एकर जमीन असताना उतारे मात्र ३० एकर क्षेत्राचे दिले आहेत. हा उद्योग संतोष पाटील याने केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यापोटी त्याला दोन लाख रुपये कमिशन मिळाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.शाखेमुळे वरणगेची बदनामीआयडीबीआय बँकेची शाखा वरणगे असली तरी वरणगेतील शेतकºयांनी फसवणूक केल्याचे आतापर्यंत तरी कुठेही चौकशीत पुढे आलेले नाही; परंतु या प्रकरणी गावाची नाहक बदनामी होत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.तलाठ्याचे शिक्के तयारकोणत्याही गावाच्या तलाठ्याचाच काय, तहसीलदारांचाही गोल शिक्का आता चार तासांत तयार करून मिळत असल्याचे महसूल विभागातीलच सूत्रांनी सांगितले. तलाठ्यांकडे जे उमेदवार म्हणून काम करतात, ते तलाठ्यांंची सही मारून दाखले वाटतात अशा तक्रारी आहेत. लोकमतने चौकशी केल्यावर ‘तुम्हाला कोणत्या गावच्या तलाठ्याचा शिक्का पाहिजे ते सांगा; तासात आणून देतो,’ असे एकाने छातीठोकपणे सांगितले !

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर