शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वीच ५० हजार गेले; वार्षिक शुल्क भरण्याचे निमित्त

By विश्वास पाटील | Updated: January 13, 2024 08:55 IST

दोन टप्प्यांत काही क्षणात घातला गंडा

विश्वास पाटील, कोल्हापूर : आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आले. परंतु ते त्या पाकिटातून काढलेही नाही तोपर्यंत त्यावरील ५० हजारांच्या बॅलन्सवर डल्ला मारल्याचा अनुभव कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उच्च शिक्षित तरुणीस आला. ७ नोव्हेंबरला ही घटना घडली, पोलिसांत वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्याची तक्रार तिने केली.

जुना राजवाडा पोलिसांत अनेकदा हेलपाटे मारले परंतु फायदा काहीच झाला नाही, आता पोलिस त्यांना तुमची तक्रार सायबर सेलकडे पाठवली असल्याने जुना राजवाडा पोलिसांतील तक्रार मागे घेण्याचा सल्ला देत आहेत.

घडले ते असे : संबंधित तरुणीस बँकेतून कार्डसाठी फोन आला. आय मोबाईल ॲप्लिकेशन दिले. त्यावर माहिती भरल्यावर आठवड्यात कार्ड घरी आले. त्यानंतर पंधरा दिवसांनी फोन आला. बँकेतून बोलतोय, तुमचे कार्ड ५० हजारचे असून ते ॲक्टिवेट करायला हवे. त्याचे वार्षिक शुल्क कपात होण्यासाठी सेटिंगमध्ये थोडी माहिती भरण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी पुन्हा तेच आय मोबाईल ॲप्लिकेशन  पाठवले. त्याने पिन किंवा ओटीपी न मागता फक्त सीव्हीव्ही नंबर भरायला सांगितला. व्हॉटस ॲपवर सीव्हीव्ही नंबर शेअर करताच २० हजार क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. तातडीने बँकेकडून मेसेज आला की ही खरेदी तुम्ही केली नसेल तर ९ बटन दाबा, त्यानुसार करूनही पुढच्या काही क्षणात पुन्हा २८,७३६ रुपये गेले. लगेच बँकेत जाऊन कार्ड ब्लॉक केले. सायबर सेलकडे तक्रार केली परंतु बँकेने रेफरन्स आणि ट्रान्झेक्शन नंबर द्यायला आठ दिवस लावले त्यामुळे व्यवहार सील करता आले नाहीत.दरम्यान, अशा घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली असून  नागरिकांनी सजगपणे बँकिंग व्यवहार करण्याची गरज आहे. तसेच सायबर पोलिसांनी अशा घटनांचा तपास वेगाने करण्याची गरज आहे.

बापरे...परतफेडीस १८ टक्के व्याज आणि जीएसटी... 

या फसवणुकीचा सायबरकडून दोन महिन्यांत शोध लागला नाही तर पैसे भरावे लागतात. त्यासाठी हप्ते मागितले तर त्यावर १८ टक्के व्याज आणि जीएसटी भरावी लागेल. ही रक्कम ९ हजार रुपये असेल असे सांगण्यात आले. हा सगळा व्यवहार पाहिल्यानंतर बँक आणि हॅकर्स यांचे काही संगनमत आहे की काय, अशी शंका तक्रारदारांना आली.

टॅग्स :fraudधोकेबाजी