शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिरढोणच्या १३ तत्कालीन सदस्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

By admin | Updated: October 2, 2015 01:13 IST

रस्ता गैरव्यवहार प्रकरण : प्रत्येकी २९ हजार वसूल करण्याचे आदेश

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंचासह तत्कालीन तेरा सदस्यांना प्रत्येकी २९ हजार १८४ रुपयांप्रमाणे ३ लाख ७९ हजार ३७८ रुपये एक महिन्याच्या आत भरण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी दिले आहेत. गैरव्यवहारप्रकरणी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनाच दोषी ठरविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार आहे. या निर्णयाने ग्रामपंचायत सदस्यांना धक्का बसला असून, राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मधुकर सासणे व रमेश ढाले यांनी तक्रार केली होती.इचलकरंजी नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामातील रस्त्याच्या खुदाईच्या नुकसानपोटी २० लाख ५६ हजार इतकी रक्कम शिरढोण ग्रामपंचायतीस नोव्हेंबर २०१२ मध्ये देण्यात आली होती. या रकमेतून २०१४ मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; मात्र काम पूर्ण करण्यापूर्वीच व कामाचे मूल्यांकन होण्यापूर्वीच ३ लाख ७९ हजार ३८४ इतकी रक्कम ठेकेदारास देण्यात आली होती. त्यामुळे या कामात गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी सासणे व ढाले यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. तसेच त्याचा पाठपुरावा म्हणून त्यांनी २६ ते २८ जानेवारी २०१५ अखेर ग्रामपंचायतीसमोर उपोषणही केले होते.तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून ३ लाख ७९ हजार ३८४ इतक्या अपहार रकमेची जबाबदारी तत्कालीन सरपंचासह तेरा सदस्यांवर निश्चित केली आणि त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा चौकशी अहवाल ग्राह्य धरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १७९ (१) नुसार जबाबदारी निश्चित झालेल्या प्रत्येक सदस्याने २९ हजार १८४ रुपये एक महिन्याच्या आत भरण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी दिले आहेत. गैरव्यवहार प्रकरणी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनाच दोषी ठरविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार असून, या निर्णयाने दोषी सदस्यांना धक्का बसला असून, राजकीय खळबळ उडाली आहे.रकमेची वसुली लागलेल्या तेरा सदस्यांमध्ये तत्कालीन सरपंच बबर पांडुरंग कांबळे, रशिदा इलाई सय्यद, सचिन भास्कर कोईक, संगीता बाळकृष्ण माळकरी, राजश्री मनोहर टाकवडे, बसवेश्वर बंडू मोरडे, राजश्री शांतीनाथ शंभूशेट्टी, श्रीपाल धुळाप्पा कापसे, दिलीपकुमार लखगोंडा पाटील, अविनाश रामगोंडा पाटील, महादेव आण्णाप्पा पुजारी, सातगोंडा दत्ता पुजारी, रमेश श्रीपती ढाले या सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, तक्रारदार असलेल्या ढाले यांनाही दोषी ठरवून रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)सार्वजनिक कामातील गैरव्यवहार आम्ही कधीही खपवून घेणार नाही. या अपहाराबाबत ग्रामस्थांच्या मनात तीव्र संताप होता. त्यांना न्याय मिळाल्याने हा विजय ग्रामस्थांचाच आहे. येथून पुढे काम करताना पारदर्शी करावे, तसेच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी याचा बोध घ्यावा.- मधुकर सासणे, शिरढोणसामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार