शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सच्या जेतेपदाचा कोल्हापुरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:44 IST

कोल्हापूर : ‘फिफा’ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या फुटबॉल संघाने अनुभवाच्या जोरावर क्रोएशियाच्या संघाचा ४-२ अशा गोलफरकाने धुव्वा उडविला. फ्रान्सच्या या विजयाचा आनंद कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी आपल्या हटके स्टाईलने साजरा केला. क्रोएशियाचा पराभव देखील अनेकांच्या जिव्हारी लागला.कोल्हापूरमधील फुटबॉलप्रेमी अर्जेंटिना, पोर्तुगाल आणि ब्राझील यांचे निस्सीम चाहते आणि कट्टर समर्थक आपापल्या आवडत्या संघांना प्रोत्साहन ...

कोल्हापूर : ‘फिफा’ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या फुटबॉल संघाने अनुभवाच्या जोरावर क्रोएशियाच्या संघाचा ४-२ अशा गोलफरकाने धुव्वा उडविला. फ्रान्सच्या या विजयाचा आनंद कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी आपल्या हटके स्टाईलने साजरा केला. क्रोएशियाचा पराभव देखील अनेकांच्या जिव्हारी लागला.कोल्हापूरमधील फुटबॉलप्रेमी अर्जेंटिना, पोर्तुगाल आणि ब्राझील यांचे निस्सीम चाहते आणि कट्टर समर्थक आपापल्या आवडत्या संघांना प्रोत्साहन देत होते. हे संघ बाहेर पडल्यानंतर कोल्हापूरच्या काही चाहत्यांनी फ्रान्सला, तर काहींनी क्रोएशियाला समर्थन दिले. क्रोएशिया-फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्याची फुटबॉलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता होती. शहरातील जुना बुधवार तालीम, कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन, जय पद्मावती तरुण मंडळ, खंडोबा तालीम, पाटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, गंगावेश, संध्यामठ, बीजीएम, खराडे कॉलेजसह हॉटेल आणि मॉल, आदी ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. फ्रान्सने अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरले. फ्रान्स समर्थकांनी चौकामध्ये घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला; तर क्रोएशिया समर्थकांच्या आनंदावर विरजण पडले. सोशल मीडियावर फ्रान्सच्या विजयाचे, तर क्रोेएशियाच्या पराभवाच्या मेमचा पाऊस पडला.