शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 14:26 IST

कोल्हापूर : अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्यव्यापी संपावर जात आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे तीन हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी होणार असून याला ३० हून अधिक ...

ठळक मुद्देसुमारे तीन हजार कर्मचाºयांचा समावेश तीस हून अधिक संघटना होणार सहभागीशुक्रवारी संपाचे परिणाम दिसून येणारसंपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती शिखर संघटनेने पाठींबा

कोल्हापूर : अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्यव्यापी संपावर जात आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे तीन हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी होणार असून याला ३० हून अधिक संघटनांनी पाठींबा दिला आहे. ‘सीपीआर’मधील सुमारे पाचशे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर जात आहेत.

या संपाबाबत पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला इशारा दिला होता.

संघटनेतर्फे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. हा संप राज्यव्यापी असून राज्यभरात साडेतीन लाखहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप एकही मागणी शासनाने मान्य केलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये जिल्'ातील कर्मचारीही सहभागी होणार आहेत, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांनी म्हंटले आहे.

या संपात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), महसूल, शिक्षण, आयटीआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तंत्रशिक्षण विभाग, कोषागार कार्यालय, विक्रीकर, आरोग्य, वैद्यकिय शिक्षण आदी विभागातील शिपाई, सफाई कामगार, वॉर्ड बॉय, चपरासी, चौकीदार, मुकादम, मजूर असे जवळपास तीन हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी होणार आहेत.

या संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती या शिखर संघटनेने पाठींबा दिला आहे तर तीसहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी पाठींबा देऊन सक्रीय सहभाग घेतला आहे.‘सीपीआर’मधील कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेले.

सकाळी १० वाजता टाऊन हॉल उद्यान येथे सर्व कर्मचारी एकत्रित येणार आहेत. या ठिकाणी संघटनेचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी घटस्थापनेची स्थानिक सुट्टी असल्याने सर्वच शासकिय कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे या संपाचा परिणाम अधिक जाणवणार नाही, परंतु उद्या, शुक्रवारी या संपाचे परिणाम दिसून येणार आहेत.

आंदोलकांच्या मागण्या

-वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे.-सर्व खात्यांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची रिक्त पदे तत्काळ भरावीत.-पदे भरताना चार टक्क्यांची अट रद्द करावी. सर्व खात्यांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना गृहखात्याप्रमाणे शासकीय वसाहत बांधून द्यावी.-चतुर्थ श्रेणीमधून तृतीय श्रेणीमध्ये २५ टक्क्यांऐवजी पाच टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नयेत.-सातवा वेतन आयोग फरकासह तत्काळ मंजूर करावा.- महापालिका, नगरपालिका यांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा.