शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

चौदा सावकारांना अटक शक्य

By admin | Updated: March 22, 2016 01:16 IST

अमोल पवार प्रकरण : दत्ता बामणेसह नगरसेवकाच्या भावाचाही समावेश; सहआरोपी करणार!

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला दहा ते तीस टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या एका नगरसेवकाच्या भावासह दत्ता बामणे व चौदा खासगी सावकारांची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. सावकारांनी अमोल पवार याच्याकडून नोटरी, स्टॅम्प केलेली करारपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. परवाना नसताना बेकायदेशीर व्याजाने पैसे देऊन ते वसूल करणाऱ्या सावकारांवर खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल करून, त्यांच्या अटकेची तयारीही पोलिसांनी केली आहे. दरम्यान, खासगी सावकारांनी वसुलीचा तगादा लावल्याने अमोल पवार याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करून निष्पाप कामगाराचा बळी घेतला. त्याला हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या दोषी सावकारांना वेळप्रसंगी खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची तयारीही पोलिसांनी केल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (पान ४ वर)आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून, याप्रकरणी कटाचा सूत्रधार अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता कोल्हापूर शहर व उपनगरांतील १४ खासगी सावकारांकडून त्यांनी सुमारे तीन कोटी ६० लाख रुपये कर्ज घेतले आहे. या सावकारांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. घरी येऊनही त्यांचे गुंड त्रास देऊन धमक्या देत होते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी खासगी सावकार प्रकाश रमेश टोणपे (वय ३६, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा रोड) व सतीश गणपतराव सूर्यवंशी (३६ रा. गणपती मंदिराजवळ, आर. के. नगर) या दोघांना चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात बोलाविले. सकाळी अकरा वाजता दोघेजण पोलिस मुख्यालयात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात या दोघांकडे स्वतंत्रपणे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. प्रकाश टोणपे याच्या चौकशीमध्ये त्याच्या वडिलाने अमोल पवारला कर्ज दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात घेतले आहे. पवार बंधूंची पोलिस कोठडीची मुदत उद्या, बुधवारी संपत आहे. त्यांची चौदा दिवसांची पोलिस कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने न्यायालयीन कोठडीनुसार त्यांची बिंदू चौक कारागृहात रवानगी होईल. त्यामुळे पोलिसांकडे तपासासाठी दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. आज, मंगळवारी इतर बारा खासगी सावकारांकडे चौकशी करून त्यांचे जबाब घेतले जाणार आहेत. त्यांची संशयित अमोल पवार, विनायक पवार यांच्यासमोर ओळखपरेड होणार आहे. सावकारांनी अमोल पवार याच्याकडून घेतलेली नोटरी, स्टॅम्प केलेली करारपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. परवाना नसताना बेकायदेशीर व्याजाने पैसे दिल्याप्रकरणी संबंधित सावकारांवर खासगी सावकारकीचा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची तयारीही पोलिसांनी केली आहे. पोलिस चौकशीमुळे सावकारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अमोल पवार याने सावकारांकडून घेतलेले कर्ज व परतफेडसावकाराचे नावकर्ज घेतलेपरत केले मागणी दत्ता बामणे २५ लाख १८ लाख३५ लाख रमेश टोणपे ३० लाख९५ लाख२ कोटी १५ लाख स्वरूप पाटील२० लाख१६ लाख२५ लाख अशोक तनवाणी५० लाख ३५ लाख५५ लाख प्रफु ल्ल शिराळे१८ लाख२५ लाख२० लाख बिपीन ओमकारलाल परमार६४ लाख८४ लाख३७ लाख सूरज साखरे ८ लाखकाही नाही१४ लाख जयसिंगराव जाधव व नीलेश जाधव६० लाख२० लाख६० लाख पांडुरंग पाटील२० लाख१३ लाख२० लाख प्रशांत सावंत३० लाख३० लाख१ कोटी ७० लाख रणजित चव्हाण१५ लाख९ लाख११ लाख आण्णा खोत३० लाख१४ लाख३० लाख सावकारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी दत्ता बामणे याची मटका व्यावसायिक विजय पाटील याच्यासोबत भागीदारी होती. दोघेजण भागीदारीमध्ये जिल्ह्णातून मटका घेत होते. मध्यंतरी या दोघांत आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याने बामणे याने स्वतंत्रपणे मटका व्यवसाय सुरू केला. त्याचे शहर व उपनगरांत मटका घेणारे एजंट आहेत. अवैध व्यवसायातून मिळालेल्या भरमसाट पैशांतून त्याने महानगरपालिकेची निवडणूकही लढवली होती. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये त्याने भाजपमधून पत्नीला उभे केले होते. दोन वेळा निवडणुकीमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. त्याच्यावर आजपर्यंत मटका किंवा सावकारकीची कारवाई झाली नव्हती. सूरज साखरे (रा. सुतारमाळ, लक्षतीर्थ वसाहत) हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. संयुक्त रविवार पेठ मंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीत बिंदू चौक येथे झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. अशोक तनवाणी (रा. गांधीनगर) याचा होलसेल मद्यविक्रीचा व्यवसाय आहे. आण्णा खोत (रा. इंगळी) उद्योजक आहे. पांडुरंग पाटील (रा. उद्यमनगर) हा वाळू ठेकेदार आहे. प्रशांत सावंत हा बेळगाव येथील उद्योजक आहे. सतीश सूर्यवंशी हा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी करीत होता. २००७ मध्ये लाच स्वीकारल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. या गुन्ह्णात त्याला शिक्षाही झाली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. नोकरी गेल्याने त्याने सावकारकीचा व्यवसाय सुरू केला. सर्वच सावकार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. या सर्वांनी सावकारकीतून कोट्यवधी रुपयांची माया कमविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे.खासगी सावकारांकडे कसून चौकशी सुरू आहे. कोणाचे परवाने आहेत, कोणाचे नाहीत, त्याची पडताळणी सुरू आहे. परवानाधारक सावकारांचा चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाईल. - दिनकर मोहिते, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाअमोलने घेतले मॅनेजरकडून कर्जअमोल पवार याच्या कृपासिंधू डेव्हलपर्समध्ये नीलेश जाधव हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. आर्थिक अडचणीमुळे पवार याने नीलेशचे वडील जयसिंगराव जाधव हे खासगी सावकारी करीत असल्याने त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत ६० लाख रुपये घेतले. या दोघा बाप-लेकांना पोलिसांनी चौकशीसाठी फर्मान काढले आहे. कार्यकर्त्यांना पिटाळून लावलेखासगी सावकार प्रकाश टोणपे व सतीश सूर्यवंशी यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांचे काही कार्यकर्ते बाहेर बाकड्यावर बसून होते. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी या कार्यकर्त्यांना पोलिस मुख्यालयातून पिटाळून लावले. दोघा माजी नगरसेवकांची लुडबूड खासगी सावकारांची चौकशी सुरू असताना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघे माजी नगरसेवक पोलिस मुख्यालयात आले. सलगीच्या पोलिस कॉन्स्टेबलकडून त्यांनी कारवाईची माहिती घेतली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व छायाचित्रकारांची नजर पडताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला.