शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

जिल्ह्यात चार हजार प्रकरणे निकाली

By admin | Updated: February 11, 2017 23:35 IST

राष्ट्रीय लोकअदालत : सांगलीत न्यायालयातील विविध खटल्यांमध्ये पाच कोटींचा दंड वसूल

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील न्यायालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४०६८ प्रकरणे निकालात निघाली. यातून पाच कोटी चार लाखांचा दंड वसूल झाला. पक्षकारांमधून यास चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. तावडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन झाले. त्यांनी लोकअदालतचा उद्देश विशद केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सौ. एन. एच. मखरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात एकूण ६३ हजार २४३ प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायाधीशांची संख्या ५१ आहे. त्यामुळे लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणांपैकी दहा हजार ३४६ प्रकरणे ठेवली होती. यातील ६५३ निकालात काढण्यात आली. तसेच दावापूर्व २९ हजार ६६ प्रकरणे ठेवली होती. यातील तीन हजार ४१५ प्रकरणे निकालात निघाली. जिल्ह्यात प्रत्येक तालुका न्यायालयातही लोकअदालतला पक्षकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून न्यायालयाच्या आवारात पक्षकारांनी गर्दी केली होती. सांगलीत जिल्हा न्यायालयात पॅनेलप्रमुख म्हणून न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर, वर्धन देसाई, जी. ए. रामटेके, श्रीपती पी. पी. खापे आदींनी काम पाहिले. यावेळी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. हरिष प्रताप उपस्थित होते. तसेच बँक, महावितरणचे अधिकारी व पक्षकार उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सत्यजित कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सर्वाधिक प्रकरणे ‘दावापूर्व’चीदिवाणी, फौजदारी, वैवाहिक, मोटार अपघात, नुकसानभरपाई, बोगस धनादेश ही न्यायालयात प्रलंबित असणारी, तर दावापूर्व ग्रामपंचायत, महावितरण व बँकांची प्रकरणे निकालात निघाली. सर्वाधिक दावापूर्व प्रकरणे निकालात काढण्यासाठी पक्षकारांकडून प्रतिसाद मिळाला. सर्व दिवाणी, फौजदारी, सत्र न्यायालय, मोटार अपघात न्यायाधीकरण, सहकार, औद्योगिक व कामगार न्यायालयामध्ये लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात प्रलंबित व दावापूर्व अशी एकूण ४०६८ प्रकरणी निकालात निघाल्याने पाच कोटी चार लाखांचा दंड वसूल झाला.आकडा वाढलागतवर्षी २९ हजार ३२९ दाखलपूर्व प्रकरणांपैकी २२६० प्रकरणे तडजोडीने निकालात काढली होती. प्रलंबित २१३ प्रकरणे निकाली निघाली होती. एक कोटी दहा लाखांचा दंडही झाला होता. यावर्षी प्रकरणे निकालात व दंड वसुलीचा आकडा वाढल्याचे दिसून येते.