शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

 मुंबई, शिवाजी विद्यापीठाची बाजी -पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा; आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 14:26 IST

पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत गुरूवारी मुंबई विद्यापीठाने कोटा विद्यापीठाला, तर शिवाजी विद्यापीठाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमवून बाजी मारली.

ठळक मुद्देपश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा

कोल्हापूर : पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत गुरूवारी मुंबई विद्यापीठाने कोटा विद्यापीठाला, तर शिवाजी विद्यापीठाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमवून बाजी मारली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या या संघांमध्ये मानांकनासाठी लढती सुरू झाल्या. आज, शुक्रवारी स्पर्धेचा सकाळी अकरा वाजता समारोप होणार आहे.

शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात कबड्डी स्पर्धा सुरू आहे. त्यात गुरूवारी सकाळी पहिली लढत मुंबई विद्यापीठ आणि कोटा विद्यापीठात झाली. आक्रमक चढाया आणि सुंदर पकडी करीत मुंबई विद्यापीठाने सामन्यावर वर्चस्व राखले. कोटा विद्यापीठाच्या चढाया कमी पडल्या.

अखेर ‘मुंबई’ ने ‘कोटा’वर ४१-२५ गुणांनी मात केली. या सामन्यासाठी सुनील कदम, कुबेर पाटील, विजय खराडे, सोनल बाबर, उत्तम नलवडे, बाळासो पाटील, बाळकृष्ण ढवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुसरी लढत चुरशीने झाली. या दोन्ही विद्यापीठांचे संघ एक वर्षानंतर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यात सामना चुरशीने झाला. त्यात वेगवान, आक्रमक चढाया करीत शिवाजी विद्यापीठाने गुणांची कमाई सुरू केली. त्याच्या तुलनेत औरंगाबाद विद्यापीठाकडून चांगल्या चढाया झाल्या. मात्र, बचावात हा संघ थोडा कमी पडला. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने औरंगाबाद विद्यापीठावर ३७-२५ गुणांनी विजय मिळविला.

शिवाजी विद्यापीठाकडून अक्षय निकम, राहुल वडार, ऋषिकेश देसाई यांनी, तर औरंगाबाद विद्यापीठाच्या आकाश पिकलगुंडे, आकाश गव्हाणे, विशाल घनगाव यांनी उत्कृष्ट खेळ केला. या सामन्यासाठी शहाजान शेख, प्रदीप बनगे, राजेंद्र बनसोडे, दिलीप चव्हाण, ऋषिकेश लोहार, रमजान देसाई, अमोल सूर्यवंशी हे पंच होते.गुणांवर ठरणार मानांकनया स्पर्धेत मुंबई, औरंगाबाद, कोटा आणि शिवाजी विद्यापीठात साखळी सामने होतील. त्यात मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर या संघाचे राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे मानांकन ठरणार आहे. या चार संघांना यावर्षी कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे चषक देवून सन्मानित केले जाणार असल्याचे संघटनेचे सदस्य बाबासाहेब उलपे यांनी संगितले. कोल्हापुरात गुरूवारी पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चुरशीने सामना झाला.  कोल्हापुरात गुरूवारी पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सामना पाहण्यास प्रेक्षकांनी गर्दी केली. (छाया : नसीर अत्तार)

टॅग्स :Kabaddiकबड्डीkolhapurकोल्हापूर