शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दोन अधिकाऱ्यांसह चौघांच्या बदल्या, कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:23 IST

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय कामाची विस्कटलेली घडी सरळ करण्याकरिता आयुक्त अभिजित चौधरी यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तसेच कामचोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दोन अधिकारी व दोन लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने बदल्या होणार आहेत.

ठळक मुद्देदोन अधिकाऱ्यांसह चौघांच्या बदल्या कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा दणका आणखी बदल्या होणार

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासकीय कामाची विस्कटलेली घडी सरळ करण्याकरिता आयुक्त अभिजित चौधरी यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तसेच कामचोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दोन अधिकारी व दोन लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने बदल्या होणार आहेत.कोल्हापूर शहर हद्दीत असलेल्या कार्यालयात एकाच ठिकाणी काम करण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा अट्टाहास असतो. बदल्यांमध्ये राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यामुळे बदल्या करण्याच्या प्रयत्नात कोणी वरिष्ठ अधिकारी पडत नाहीत. एकाच ठिकाणी काम केल्यामुळे या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण होते. त्याला छेद देण्याचा प्रयत्न आयुक्त अभिजित चौधरी यांनी केला आहे.वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता यादी तयार करण्याचे आदेश कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्यावर सोपविण्यात आले होते. त्याच्या याद्याही तयार झाल्या आहेत. आयुक्त या याद्यांची छाननी करून बदल्यांचा निर्णय घेत आहेत. त्यानुसार गुरुवारी चौघांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.परवाना विभागाचे अधीक्षक सचिन जाधव यांची बदली कार्यशाळा विभागाकडे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याकडील इस्टेट विभागाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. स्थानिक संस्था कर विभागाकडील सहायक अधीक्षक रामचंद्र काटकर यांची बदली परवाना अधीक्षक म्हणून करण्यात आली.

त्याचबरोबर नगदीकडील वरिष्ठ लिपिक अनिल भंडारी यांची इस्टेटकडे तर कनिष्ठ लिपिक संदीप उबाळे यांची राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलकडून प्राथमिक शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. चौघांनाही तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बदल्यांमध्ये राजकीय दडपण आणण्याचा प्रयत्न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर