शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अडकलेल्या आजीबाई चार महिन्यानंतर पोहोचल्या लेकीच्या गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:52 IST

लॉकडाऊनमुळे चार महिने कुशिरे (ता.पन्हाळा) येथे मंदिरात राहत असणाऱ्या आजीबाई आज आपल्या लेकीच्या गावी गेल्या.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे आडकलेल्या आजीबाई चार महिन्यानंतर लेकीच्या गावाला...पन्हाळा तालुक्यातील कुशिरे गावची घटना

पोहाळे तर्फ आळते/कोल्हापूर :लॉकडाऊनमुळे चार महिने कुशिरे (ता.पन्हाळा) येथे मंदिरात राहत असणाऱ्या आजीबाई आज आपल्या लेकीच्या गावी गेल्या. या आजीचे नाव किसनाबाई गणेश चकोर (मु.पो. निराळी ता.सिन्नूर ‍जिल्हा नाशिक) असे आहे.

आज रविवार दि.19 जुलै रोजी हया आजीला पन्हाळा तहसिलदार, कुशिरे दक्षता समिती यांनी ई-पास काढून चारचाकी मोटारगाडीने तिच्या लेकीच्या गावी मोहपाडा (ता.खालापुर जि.रायगड) येथे पाठविले. तिच्या मुलीकडे पाठविण्यासाठी कुशिरे येथील तलाठी सुवर्णा कराड यांनी परिश्रम घेतले.

नाशिक जिल्हयातील ७० वर्षाची वृध्दा मार्च महिन्यात महालक्ष्मी, जोतिबा देवाचे देवदर्शन घेण्यासाठी रेल्वेने कोल्हापूरात आल्या होत्या. लॉकडाऊन होण्यापूर्वी तिने कोल्हापूरातील देवदेवतांचे दर्शन घेतले आणि गावी माघारी जाण्यासाठी निघाली तेवढयात कोरोनाचं सावटामुळे कोल्हापूर जिल्हा लॉकडाऊन झाला.

रेल्वे व एसटी सेवा बंद झाली. जोतिबा डोंगरावर असणाऱ्या या आजी पायवाटीतून कुशिरे गावात आल्या. दरम्यान कुशिरे येथील दक्षता समितीने तिची ग्रामदैवत हनुमान मंदिरात राहण्याची व्यवस्था केली व जेवणाची व्यवस्था गुरव यांच्या घरी केली.

गावाकडे आपली विवाहीत मुलगी आहे ती मला सांभाळेल अशी ती सारखी बोलत होती मात्र, मुलीचा मोबाईल नंबर तिला सांगता येत नव्हता. कुशिरे येथील तलाठी सुवर्णा कराड यांनी तिला विश्वासत घेऊन मानसिक आधार दिला तसेच आजीच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. ‍

आजीची कौटुंबिक माहिती घेऊन तिच्या मुळ गावी महसूल यंत्रणेमार्फत शोध घेतला व तिच्या मुलगीचा मोबाईल क्रमांक मिळविला. या आजीने आपल्या मुलीबरोबर मोबाईलद्वारे संभाषण केले.

सोमवारपासून दि.२० जुलैपासून कोल्हापूर जिल्हा बंदी असल्याने या वृध्द महिलेला आज‍ तिच्या कुटुंबीयाकडे पाठविण्यासाठी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, निवासी तहसीलदार कौलवकर, मंडल अधिकारी दाणी व तलाठी सुवर्णा कराड, कुशिरे सरपंच अनुराधा घोरपडे, पोलीस पाटील, संदीप माळवी,सर्जेराव घोरपडे, ग्रापंचायत सदस्य संतोष साबळे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर