शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पालिकेचे चार कोटी खड्ड्यात

By admin | Updated: July 19, 2016 00:13 IST

इस्लामपुरातील चित्र : नवीन रस्त्यांचा फ्लॉप शो; निकृष्ट कामाबाबत विरोधक आवाज उठविणार

अशोक पाटील -- इस्लामपूर  पालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर जवळजवळ पावणेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे रस्ते पहिल्याच पावसात धुऊन गेल्याने ठिकठिकाणी पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यावर विरोधी पक्षांनी आवाज उठवला असला तरी, सत्तेच्या धुंदीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी या प्रकारावर मौन धारण करणे पसंद केले आहे.शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे काम युनिटी बिल्डर्स अँड रोड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि., कराड यांना देण्यात आले होते. रस्ते तयार करताना ठेकेदाराने नियम व अटींचे पालन केलेले नाही. याविरोधात वेळोवेळी काँग्रेसचे वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार यांनी काम बंद पाडून नियमाने रस्ते करण्याची मागणी केली होती. यावरुन अनेकवेळा सत्ताधाऱ्यांबरोबर खडाजंगीही झाली होती. तरीही मुजोर असलेल्या सत्ताधारी व ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचीच कामे केली आहेत. यामुळेच पहिल्याच पावसात सर्व काही धुऊन गेले आहे.शहरात विविध ठिकाणी केलेले रस्ते आणि त्यावर केलेला खर्च पाहता रस्त्याचा दर्जा सर्वसामान्यांच्या नजरेतून सुटत नाही. या रस्त्यातून किती लाखांचा मलिदा मिळाला, याची आकडेमोड करण्यात विरोधकांनी डोकी लावली आहेत. आतापर्यंत शहरात झालेल्या रस्त्यांवरील खर्च : १. आष्टा नाका ते तहसील कार्यालयापर्यंत (७४ लाख ५० हजार ५००). २. आष्टा नाका ते संभूआप्पा मठ ते मुरारराव शिंदे घर (४९ लाख ९२ हजार). ३. शिराळा नाका ते मोमीन मोहल्ला ते उर्दू हायस्कूल ते जयसिंह टॉकीज (६१ लाख ६५ हजार ५००). ४. झरी नाका ते आझाद चौक ते संभाजी चौक ते यल्लमा चौक (७४ लाख ९९ हजार ८००). ५. जुनी भाजी मंडई ते शाळा नं. १ पर्यंत (६२ लाख २० हजार. ६. शिराळा नाका ते गणेश मंदिर ते कापूसखेड नाका (४३ लाख २५ हजार). ७. यल्लम्मा चौक ते जुना बहे नाका (४३ लाख २५ हजार), असे पावणेचार कोटी रुपये खर्ची पडले आहेत. या रकमेच्या तुलनेत रस्ते झालेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. रस्त्यांची कामे देताना ठेकेदाराकडून करारपत्र घेण्यात येते. या करारपत्राप्रमाणे रस्त्याची कामे झालीच नाहीत. करारपत्रावरील काही तारखा हाताने लिहिल्या आहेत. त्यामुळे पालिका आणि ठेकेदार यांच्यामध्ये झालेला करारही संशय निर्माण करणारा असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे.एकंदरीत शहरातील झालेली सर्वच विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली असून, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरासह जिल्ह्यातील विकास कामांवर नवोदित राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही बैठका घेऊन लक्ष घातले आहे. यातून काय साध्य होणार, हे आगामी काळातच समजणार आहे.