शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

शिये टोलनाक्याजवळील बंगल्यात चार लाखांची चोरी

By admin | Updated: April 20, 2017 23:57 IST

रोख रकमेसह दागिन्यांचा समावेश : कुटुंबीय सहलीला गेले असता चोरट्यांचा डल्ला

कसबा बावडा : एम.आय.डी.सी. रोडवरील शिये टोल नाक्याशेजारील शेतवडीत असलेल्या बंगल्याचा अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार असा एकूण साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली व मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सावंता बापूसाहेब माळी यांच्या घरात ही घटना घडली. याबाबत शाहूपुरी पोलिसांत नोंद झाली आहे. घटनास्थळी श्वानपथकाने पाहणी केली. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सावंता बापूसाहेब माळी आपल्या परिवारासह दक्षिण भारत सहलीला गेले होते. ते जेव्हा बाहेर गावी जातात तेव्हा त्यांचा नोकर राजाभाऊ एकनाथ नवले बंगल्याच्या खालील खोलीत राहायला असतो. सोमवारी रात्री तो उसाला रात्रपाळीचे पाणी देण्यासाठी दुसऱ्या शेताकडे गेला. सकाळी येऊन पाहतो, तर बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले होते. बंगल्यातील साहित्यही विस्कटलेले होते. त्यांनी आपल्या मालकांना मोबाईलवरून ही माहिती दिली. सावंता माळी यांनी दक्षिण भारताच्या दौऱ्यावरून आपण लगेचच घटनास्थळी पोहचू शकत नाही म्हणून आपल्या रायगड येथे डॉक्टर असलेल्या संजय या मुलाला ही माहिती दिली. संजय माळी यांनी ही माहिती पोलिसांनी दिली; परंतु नेमकी किती रुपयांची चोरी झाली, हे सावंता माळी घरी नसल्याने समजू शकत नव्हते. माळी कुटुंब बुधवारी रात्री कोल्हापूरला आल्यानंतर पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. घटनास्थळी श्वान घुटमळले. माळी कुटुबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे १५ तोळे दागिने चोरीला गेले असल्याचे सांगितले. त्यात गंठण, बांगड्या यांचा समावेश आहे. तसेच रोख पाच हजार रुपये गेल्याचेही सांगण्यात आले. (वार्ताहर)