दरम्यान, माणगाव ग्रामपंचायतीने गावबंदचे कडक अंमलबजावणीस सुरुवात केली असून, गावातील नागरिक बाहेर व बाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश बंद करण्यात आला असून, गावच्या तिन्ही सीमा मार्गावर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांची नेमणूक आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडून करण्यात आली आहे. गावाबंद काळात विनाकारण गल्लीत बसणारे व विनामास्क फिरणारे नागरिकांचे चलचित्रद्वारे चिञण करण्यात आले असून, अशा नागरिकांचे मालमत्ता करामध्ये वीस टक्के दंडाची आकारणी करण्यात आले आहे. माणगाव येथे आजपर्यंत कोरोनाचे ५२ रुग्णांना संसर्ग झाला असून, यापैकी तेवीस बरे, चार मृत, पंधरा रुग्ण विविध वैद्यकीय केंद्र, तर दहा रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
काही बाधित रुग्ण संसर्ग झाल्याचे माहिती झाकून ठेवत असल्याने समूह संसर्ग वाढण्याची शक्यता असून, या रुग्णांच्या कुुटुंबातील अन्य सदस्य इतरांच्या संपर्कात आल्याने गेली तीन दिवसांत संसर्ग रुग्ण वाढले आहेत. तसेच यातील काही रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याने संसर्ग वाढत असून, अशा रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात यावे तरच गावातील संसर्ग मर्यादित येईल, असे मत जाणकार व वैद्यकीय क्षेञातून व्यक्त होत आहे.
चौकट
गावात विनामास्क फिरणारे सरपंच यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या मालमत्ता करात वीस टक्के दंड व या दंडाची रक्कम त्वरित भरण्याचे नोटीस सरपंच राजू मगदूम यांनी दिले असून, विनामास्क फिरणारे नागरिक यांच्यावर यापुढे गुन्हे दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.