शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साडे चारशे महसूल कर्मचारी संपावर, रक्तदान आंदोलन करत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:30 IST

महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील साडे चारशे महसूल कर्मचारी संपावररक्तदान आंदोलन करुन शासनाचा निषेध : ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप

कोल्हापूर : महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालयातील वर्ग-३ व वर्ग-४ चे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी एकवटले. या ठिकाणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विलासराव कुरणे, जिल्हाध्यक्ष सुनील देसाई यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

दरम्यान सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील करवीर प्रांताधिकारी कार्यालय येथे शासनाच्या निषेधार्थ आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी झाले. यावेळी बहुतांश कर्मचाºयांनी रक्तदान करुन शासनाच्या उदासिन भूमिकेचा निषेध केला. या संपात एकूण ६५० पैकी ४५० कर्मचारी सहभागी झाले.

उर्वरीत कर्मचारी हे पूराशी संबंधित कामात असल्याने ते सहभागी होऊ शकले नाहीत. या संपामुळे झालेल्या नागरिकांच्या गैरसोयीबद्दल संघटनेतर्फे दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर ५ सप्टेंबरपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.आंदोलनात विनायक लुगडे, अकिल शेख, विनायक लुगडे, संदीप पाटील, संतोष वाळके, श्ांकर गुरव, राणी शिरसाट, विद्या शिंदे, दत्ता पाडळकर, सचिन सवळेकरी, अश्विनी कारंडे, नारायण पाटील, विनय बोळके, अजय लुगडे, गणेश जाधव आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर