शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कोरोनाचा संसर्ग, शहरात नवीन १८० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:15 IST

कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग सुरूच असून रोज नवीन रुग्ण समोर येऊ लागले आहेत. बुधवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, भुदरगडचे प्रांताधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जिल्हा एड्स नियंत्रण समन्वय अधिकारी दीपा शिपूरकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमाजी आमदार महादेवराव महाडिक यांना कोरोनाचा संसर्गशहरात नवीन १८० रुग्ण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग सुरूच असून रोज नवीन रुग्ण समोर येऊ लागले आहेत. बुधवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, भुदरगडचे प्रांताधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जिल्हा एड्स नियंत्रण समन्वय अधिकारी दीपा शिपूरकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. बुधवारी कोरोनाचा संसर्ग झालेले १८० नवीन रुग्ण शहरातील विविध भागांत आढळून आले; तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काल त्यांची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे पत्रक जाहीर केले. त्यांनी या संकटाचा धैर्याने आणि  जिद्दीने मी सामना करेन, आणि प्रकृतीची उत्तम  काळजी घेईन याबद्दल निश्चिन्त राहावे असॆ आवाहन केले आहे.

अलीकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्यांची आपली कोविड १९ चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यानच्या काळात कोणतेही अडचणीचे काम असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा, असेही त्यांनी कळविले आहे. 

शहरातील बहुतांश भागांत आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्याने एकही भाग सोडलेला नाही. गर्दीची ठिकाणे, रुग्णांचा नजीकचा संपर्क आणि पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

बुधवारी शहरात १८० रुग्ण आढळून आले. त्यामध्ये शिवाजी पेठेतील १३, राजारामपुरीतील १०, कसबा बावडा येथील चार, मंगळवार पेठेतील ११, तर शाहूपुरी, जवाहरनगर, कदमवाडी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क येथील प्रत्येकी सात रुग्णांचा समावेश आहे.

लक्ष्मीपुरी, कपीलतीर्थ भाजी मंडई येथे व्यापारी व विक्रेत्यांना संसर्ग होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या दोन्ही ठिकाणी महानगरपालिकेने घेतलेल्या तपासणी मोहिमेत १५ हून अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

आतापर्यंत शिवाजी पेठेत ३७० तर राजारामपुरीत ४३१ रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवार पेठेत ३०२ , शाहूपुरीत २११ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ५५३० वर, तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या १७० वर जाऊन पोहोचली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर