गारगोटी : मेघोली धरणफुटीमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेती, पिकाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळण्यासाठी सरकार संवेदनशील असणे आवश्यक आहे. पण या संवेदनशून्य सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांबरोबर असेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेघोली येथे घटनास्थळी भेट देऊन मेघोली, तळकरवाडी, नवले येथील बाधित शेतकरी व नागरिकांची भेट घेतली व बाधित भागाची पाहणी केली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने तळकरवाडी येथील ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. तर नवले येथील जनावारे दगावलेल्या निवृत्ती मोहिते यांना व महापुरात वाहून गेलेल्या जिजाबाई मोहिते यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार मदत तसेच आपल्या जिवाची पर्वा न करता बचावकार्यात सहभागी झालेल्या युवकांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ५ हजारांची मदत चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी मेघोली, तळकरवाडी, नवले, वेंगरूळम, ममदापूर, सोनुर्ली येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी जि.प. माजी सदस्य राहुल देसाई, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत, देवराज बारदेस्कर, अलकेश कांदळकर, विनायक परूळेकर, प्रा. धनाजी मोरूस्कर, बाजीराव देसाई यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : ११ गारगोटी चंद्रकांत पाटील