शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:35 IST

पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार विष्णु उर्फ बाळासाहेब रावसो भोसले (वय ६७) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय परिषद सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. 

ठळक मुद्देपन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष

पन्हाळा : पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार विष्णु उर्फ बाळासाहेब रावसो भोसले (वय ६७) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय परिषद सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. बाळासाहेब धाकटी कन्या डॉ. कोमल हिच्या विवाह समारंभासाठी १० फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गेले होते. विवाह समारंभ झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली.बाळासाहेब १९९५ मध्ये पन्हाळ्याचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीतच सोमेश्वर तलावाचा गाळ काढण्यात आला. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता तसेच पन्हाळगडावरील शिवतीर्थ तलाव विकसित करण्यासाठी ते धडपडत होते. मसाई पठार विकासासाठी त्यांनी सादर केलेली योजना सरकारकडे प्रलंबित आहे.१९८0 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पन्हाळा मतदारसंघातून निवडणूकही लढविली होती. पन्हाळा विकास आघाडीच्या माध्यमातून ते पन्हाळ्याच्या विकासासाठी सातत्याने धडपडत होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघाची स्थापना त्यांनी केली. या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांना त्यांनी एकत्र आणले. सांगलीच्या नवसंदेश आणि नंतर सामना दैनिकातून ते लिहित होते. सध्याही नवसंदेशमधून सातत्याने ते लिखाण करत होते.पन्हाळगडावरील प्राचीन अंबाबाई मंदिर भक्त मंडळामध्येही ते सक्रिय होते. या मंदिराचा जीर्णोध्दारही त्यांनी केला होता. पन्हाळा, जोतिबा, वीरशिवा काशिद आदी ऐतिहासिक व पौराणिक विषयावरील छोटेखानी पुस्तिका त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांचा कल  होता. पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी ऐतिहासिक आणि दुर्लक्षित परिसरात माहितीचे फलक लावले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर