शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

'गोकुळ'च्या निवडणुकीची औपचारिकताच शिल्लक : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 18:03 IST

GokulMilk Kolhapur HasanMusrif : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीवरील दूध उत्पादकांचा विश्वास आणि ठरावधारक सभासदांचा प्रचार दौऱ्यातील प्रतिसाद पाहता माझी खात्री झाली आहे की,आमची आघाडी प्रचंड मतांनी विजयी होईल, आमचे सर्वच म्हणजे २१ उमेदवार बाजी मारतील.त्यामुळे'गोकुळ'च्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे.आमचे डोळे आता चेअरमन निवडीकडे आहेत, असा विश्वास ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे'गोकुळ'च्या निवडणुकीची औपचारिकताच शिल्लक : मुश्रीफआमचे डोळे चेअरमन निवडीकडे, गडहिंग्लजला प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

गडहिंग्लज : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीवरील दूध उत्पादकांचा विश्वास आणि ठरावधारक सभासदांचा प्रचार दौऱ्यातील प्रतिसाद पाहता माझी खात्री झाली आहे की,आमची आघाडी प्रचंड मतांनी विजयी होईल, आमचे सर्वच म्हणजे २१ उमेदवार बाजी मारतील.त्यामुळे'गोकुळ'च्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे.आमचे डोळे आता चेअरमन निवडीकडे आहेत, असा विश्वास ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.येथील हॉटेल सूर्यामध्ये आयोजित चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, गेली २० वर्षे ज्या पद्धतीने सत्ता राबवली गेली. त्याचा प्रचंड राग मतदारांमध्ये पदोपदी जाणवतो.म्हणूनच,गोकुळ दुध संघ मल्टीस्टेट करून घशात घालण्याचे कारस्थान सभासदांनी हाणून पाडले.आमदार राजेश पाटील म्हणाले, गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तिन्ही तालुक्यांत आपल्या आघाडीची बाजू भक्कम आहे.विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आघाडीला मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून काम करत आहे. पक्ष व संघटना यास महत्त्व देणारा व नेत्यांचे आदेश मानणारा मी सच्चा व लढवय्या कार्यकर्ता आहे. मी या निवडणुकीत मताधिक्यासाठी रक्ताचे पाणी करेन.यावेळी रामाप्पा करीगार,उदय जोशी, वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, सुधीर देसाई,अमर चव्हाण,जयसिंग चव्हाण, अभय देसाई,आभिजीत पाटील, बाबासाहेब पाटील,सोमगोंडा आरबोळे, गंगाधर व्हसकोटी, संतोष पाटील, जयकुमार मुन्नोळी, राकेश पाटील, प्रकाश पताडे, काशिनाथ तेली मारुती घोरपडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर