शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करा, महागाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:25 IST

morcha, kolhapurnews कोरोनाच्या संकट काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. कंपन्यांनी कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि शासनाने मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत, या मागणीसाठी महागाव (ता. गडहिंग्लज) येथील पाच रास्ता चौकात आंदोलन करण्यात आला.

ठळक मुद्देमायक्रो फायनान्सची कर्जे माफ करा, महागाव येथे रास्ता रोको जनता दल, कृती समितीचे आंदोलन

महागाव : कोरोनाच्या संकट काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. कंपन्यांनी कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि शासनाने मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत, या मागणीसाठी महागाव (ता. गडहिंग्लज) येथील पाच रास्ता चौकात आंदोलन करण्यात आला.जनता दल आणि मायक्रो फायनान्स कृती समितीतर्फे फायनान्स कंपन्यांच्या कर्जदार महिला बचत गट आणि गोरगरीब महिलांनी केलेल्या आंदोलनामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली. माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.शिंदे म्हणाले, खाजगी मायक्रो फायनान्स कंपन्यांचा सावकारी धंदा सुरू आहे. त्यांच्या व्याज आकारणीची चौकशी व्हावी, ज्या कर्जदारांनी ज्यादा व्याज भरले आहे त्यांना ते परत द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदार व फायनान्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घ्यावी.यावेळी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणीसाठी दौºयावर आलेले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. खोत म्हणाले, महिला बचत गटांची मायक्रो फायनान्स कंपन्या आणि बँकेकडील कर्जे कोणत्याही परिस्थितीत माफ झाली पाहिजेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र घेवून हा प्रश्न अधिवेशनात मांडू. बाळेश नाईक म्हणाले, तालुक्यातील हलकर्णी, नूल येथेही मेळावे घेवून मोर्चे काढणार आहे.यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, प्रशांत पाटील, संजय कांबळे, संजय रेडेकर, विद्या कांबळे, नूरजहाँ सनदी, धीरज देसाई, सागर कांबळे यांचीही भाषणे झाली. आंदोलनात उदय कदम, दिलीप कांबळे, कृष्णराव रेगडे, नितीन पाटील, बाळकृष्ण परीट, हिंदूराव नौकुडकर, तानाजी कुराडे, पप्पू सलवादे, बापूसाहेब कांबळे, शशीकांत चोथे, चाळू पाटील, शोभा भोगूलकर, रंजना शिंदे, महादेवराव शिंदे, चंद्रकांत कांबळे आदींसह बचत गट, कर्जदार महिला सहभागी झाल्या होत्या.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर