शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांना म्युकरवरील उपचारांची सक्ती करा:शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 17:20 IST

: म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांवरील उपचाराची सक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबत प्रशासनानेही पावले उचलत मंगळवारी दुपारी ४ वाजता खासगी रुग्णालयांची बैठक बोलावली आहे.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयांना म्युकरवरील उपचारांची सक्ती कराशिवसेनेची मागणी

कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांवरील उपचाराची सक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबत प्रशासनानेही पावले उचलत मंगळवारी दुपारी ४ वाजता खासगी रुग्णालयांची बैठक बोलावली आहे.या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यावर सध्या केवळ सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे सीपीआरवर मोठा ताण येत आहे. शहर-जिल्ह्यातील पाच दवाखाने शासनाने उपचारासाठी जाहीर केले आहे. मात्र, आजवर सीपीआरमध्ये २५ शस्त्रक्रिया तर तीन खासगी दवाखान्यात झाल्या आहेत. ज्या रुग्णालयांना शासकीय योजना लागू आहेत त्यांनीही हात वर केले आहेत.

या रुग्णांचे उपचाराच्या व पैशाच्या पातळीवरदेखील हाल होत आहेत. त्यामुळे जे दवाखाने शासकीय योजनांचा लाभ घेतात त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची तातडीने बैठक घेण्यात यावी व त्यांना म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी द्यावी. अन्यथा कायद्याच्या चौकटीत धडा शिकवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी दुपारी ४ वाजता याबाबत बैठक होणार आहे. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, मंजित माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलShiv SenaशिवसेनाMucormycosisम्युकोरमायकोसिसkolhapurकोल्हापूर