शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

‘फिल्मफेअर’च्या रूपाने फुटबॉलचा सन्मान -सतीश सूर्यवंशी -संडे स्पेशल मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:44 AM

कोल्हापूरच्या मातीत किती प्रमाणात फुटबॉल रूजला आहे ही बाब जगासमोर आणण्यासाठी हा माहितीपट मी तयार केला - सतीश सूर्यवंशी

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादयापुढेही कोल्हापूरवर एक चित्रपट कथानक तयार आहे

सचिन भोसले ।मूळचा कोल्हापूरचा असलेला; पण सध्या मुंबईत चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सचिन सूर्यवंशी याने माजी फुटबॉलपटू सतीश सूर्यवंशी यांच्या साहाय्याने ‘द सॉकर सिटी’ या कोल्हापूरफुटबॉलवर तयार केलेल्या २५ मिनिटांच्या माहितीपटाला ‘फिल्मफेअर ’ हा मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे सचिनला नवी ओळख मिळाली. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : या माहितीपटाची संकल्पना कशी सुचली ?उत्तर : गेल्या १५ वर्षांपासून फुटबॉलपटू सतीश सूर्यवंशी हे फुटबॉल ‘महासंग्राम’ ही स्पर्धा भरवतात. त्याचे डिजिटल फ्लेक्स, ब्रँडिंग, आदीचे काम मी स्वत: करीत आहे. त्यातील सूर्यवंशी यांची फुटबॉल खेळाप्रतीची तळमळ बघून २००८ साली ९३ मिनिटांची पहिली फिल्म या फुटबॉलवर केली होती; मात्र, त्याला यश आले नाही; पण मी आशा सोडली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी, सतीश दोघेही यावर काम करीत आहे. त्याचा परिपाक म्हणून ही फिल्म फिल्मफेअरच्या नामांकनासाठी पाठविली. त्यातून नामांकनही मिळाले आणि सरतेशेवटी फिल्मफे अर अवॉर्डच्यारूपाने यश मिळाले.

प्रश्न : या यशासाठी किती संघर्ष करावा लागला ?उत्तर : माझे शिक्षण न्यू कॉलेजमधून झाले आहे. मी विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे; त्यामुळे साहजिकच आई-वडिलांनी त्यात करिअर कर, असे सांगितले होते. मला मुळात कलानिकेतनला प्रवेश घेऊन चित्रकार व्हायचे होते. ते म्हणायचे बोर्ड रंगवून पेंटर व्हायचे आहे का? त्यामुळे चार वर्षे माझ्याबरोबर घरातले कोणीही बोलले नाही, की माझ्याबरोबर संपर्कही ठेवला नाही. पदवीनंतर मी निर्मितीचे अनंत खासबारदार यांच्याकडे काम केले. त्यानंतर गेली १२ वर्षे मी मुंबईत चित्रपट निर्मात्याकडे सहायक दिग्दर्शक, पटकथालेखक म्हणून काम करीत आहे.

प्रश्न : ‘फुटबॉल’वरच का माहितीपट करावा, असे वाटले ?उत्तर : आजही स्थानिक संघांकडून खेळणारे फुटबॉलपटू पडेल ते काम करून स्पर्धांमध्ये कौशल्य दाखवितात. याकडे देशभरातील उद्योग समूह, उद्योजक, मोठे क्लब यांचे लक्ष वेधावे. त्यातून या खेळाडूंना कोणीतरी दत्तक घ्यावे. नोकरी मिळावी यासाठी हा माहितीपट मी सतीश यांच्या सहकार्यातून तयार केला. कोल्हापुरात चांगले खेळाडू आहेत; पण त्यांच्या कौशल्याची दखल घेऊन मदतीसाठी हात पुढे यावेत ही अपेक्षा.वेगळ्या प्रयोगास यशकोल्हापूरच्या फुटबॉलचाही गवगवा राष्ट्रीय पातळीवर व्हावा, यातून स्थानिक फुटबॉलपटूंना करिअर करण्याची संधी मिळावी, देशाचे लक्ष ‘शाहू स्टेडियम’वरील फुटबॉल आणि खेळाडूंवर वेधले जावे; यासाठी हा वेगळा प्रयोग केला आणि फिल्मफेअरच्या रूपाने त्याला भरघोस यश मिळाले.पुरस्काराची दखलफुटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रथमच बनविलेल्या या फिल्मची दखल वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन या फुटबॉलमधील सर्वोच्च संस्थांनी घेतली. ती विशेष शेअरही केली. त्यात सचिव हेन्री यांनीही तिचे विशेष कौतुकही केले आहे. संस्थानकालापासून छत्रपती घराण्याने या खेळाला राजाश्रय दिला आहे. के. एस. ए. पेट्रन चीफ शाहू छत्रपती, मालोजीराजे , मधुरिमाराजे यांनीही पाठीवर कौतुकाची थाप टाकली; त्यामुळे आणखी ऊर भरून आला. यापुढेही कोल्हापूरवर एक चित्रपट कथानक तयार आहे; यासाठीही दिग्गज निर्मात्यांकडून विचारणा केली जात आहे.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर