केळोशी बु॥, केळोशी खुर्द, खामकरवाडी, बुरंबाळी, धामोड येथील तरुणांनी एकत्र येत आमदार प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले. वाढदिवसासाठी उधळपट्टी न करता जमा केलेल्या पैशातून कोविड केंद्रातील रुग्णांना फळे व अन्नदान करण्याचे ठरवले . सकाळी दहा वाजता या सर्व तरुणांनी एकत्र येत क॥ वाळवे येथील स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव भोईटे केअर सेंटरमध्ये जाऊन तेथील रुग्णांना फळे व अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेतला.
या कार्यक्रमास सर्जेराव भिऊंगडे, संदीप मगर, संदीप पाटील, स्वप्निल कांबळे, दीपक खामकर, दत्तात्रय चौगले, जयराम चौगले, निखिल पाटील, दत्ता हुजरे, अनिकेत पाटील, सूरज बारड, ग्रा. पं. सदस्य चांदेकर, गणराज पवार, वैभव कांबळे, प्रतिराज कोपर्डेकर आदींसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सचिन पाटील यांनी मानले.