शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील सैन्यभरतीवेळी ‘व्हाईट आर्मी’चे अन्नछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 13:19 IST

जीवन मुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी)च्या वतीने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीत आयोजित सैन्य भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरत्नागिरीतील सैन्यभरतीवेळी ‘व्हाईट आर्मी’चे अन्नछत्रसलग १४ वर्षे उपक्रम : ३० हजार तरुणांची सोय होणार

कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी)च्या वतीने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीत आयोजित सैन्य भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सैन्य भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात तरुण येतात. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे भरतीच्या काळात जेवणाखाण्याचे हाल होतात. मुले बिस्कीटे खाऊन, पाणी पिऊन, थंडी वाऱ्यात उपाशी झोपून दिवस काढतात. या मुलांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम १४ वर्षांपूर्वी व्हाईट आर्मीने सुरू केला.

केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर सांगली, कवठेमहांकाळ, सोलापूर, फलटण, रत्नागिरी, गोवा येथे सैन्यभरतीवेळी मोफत अन्नछत्र उभा केले होते. आतापर्यंत भारतीय स्थलसेना, वायूसेना, १०९ टी. ए. मराठा, माजी सैनिक हरीत सेना, एफआरडीएफ पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या साडेपाच लाख तरुणांना अन्नछत्राचा लाभ झाला आहे.

अन्नछत्र चालविण्याची जबाबदारी व्हाईट आर्मीचे जवान करतात. जे जेवण बनविले जाते, ते शिस्तबद्ध पद्धतीने वाटप केले जाते. या अन्नछत्राची सैन्य दलातील मेजर जनरल, जनरल, ब्रिगेडीअर्स, कर्नल, आदी अधिकाऱ्यांनी प्रशंसा केल्याचे रोकडे यांनी सांगितले.

सैन्यभरती मोफत अन्नछत्रास धान्य, आर्थिक स्वरूपात मदत वा सेवा करायची असेल त्यांनी व्हाईट आर्मी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही अशोक रोकडे यांनी यावेळी केले. 

 

टॅग्स :foodअन्नkolhapurकोल्हापूर